नागपूर - आईचे निधन झाल्यानंतर जीवनात आलेल्या नैराश्यातून ( Suicide Attempted on Frustration ) नागपूर शहरातील अंबाझरी तलावात ( Ambazari Lake ) आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतलेल्या एका तरुणाला अंबाझरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ( Ambazari Police Station Officers ) जीवाची बाजी लावून सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले आहे. हर्ष राजेश मेंढे (२०) असे या तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी एका अपघातात त्याच्या आईचा करुण अंत झाला होता. हर्षच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू झाल्याने या घटनेचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. ज्यामुळे तो नैराश्येच्या गर्केत अडकत जात होता. या आधी सुद्धा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती पुढे आली आहे.
अंबाझरी तलावात एका अनोळखी पुरूषाचे प्रेत दिसत असल्याच्या माहीतीवरून अंबाझरी पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या संबंधाने पोलिसांची कार्यवाही सुरू असताना एका युवकाने स्वतःचा जिव देण्याकरीता अंबाझरी तलावाचे पंप हाऊस जवळ अचानक तलावात उडी घेतली. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच घटनेचे प्रसंगावधान राखत तत्काळ स्थानिक पोहणारे देविदास जांभुळकर यांच्या मदतीने युवकाला सुखरूप पाण्या बाहेर काढले. ज्यामुळे त्याला जीवनदान मिळाले आहे. पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी देखील त्याला जवळ घेऊन धीर दिला. त्या तरुणाला शांत करून त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने स्वतःचे नाव हर्ष राजेश मेंढे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हर्षच्या वडिलांना बोलावून हर्षला त्यांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांच्या तत्परतेने सर्वत्र कौतुक -
हर्षच्या आईच्या अकस्मात मृत्युमुळे तो नैराष्यात गेला होता. त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी त्या तरुणाचे समुपदेशन केले. पोलीसांनी घटनेचे प्रसंगावधान तरुणाला जीवनदान दिल्याने संपूर्ण नागपुरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - ठाणे : नवजात बालिकेचा सौदा करणाऱ्या आई - वडिलांसह 6 जणांना अटक