ETV Bharat / city

Nagpur Young Woman Gang Raped : उच्चभ्रू वस्तीतील तरुणीचे अपहरण करून दोन नराधमांनी केला बलात्कार - फेटरी येथील तरूणीचे अपहरण करून बलात्कार

नागपूर शहरातील अतिशय उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या रामदासपेठ येथून सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन आरोपीं संगनमत करून एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर त्या तरुणीवर कळमना येथे नेऊन सामूहिक बलात्कार ( Young Woman Abducted and Gang Raped ) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पिडीत तरुणी ही गाण्याच्या शिकवणी वर्गात जात असताना नराधमांनी तिचे अपहरण केले. पीडित तरुणीला त्याच अवस्थेत सोडून आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला, त्यानंतर तरुणीने कळमना पोलीस ठाण्यात जाऊन ( Rape complaint Filed Kalamna police station ) तक्रार नोंदवली आहे

Young Woman Abducted Gang Raped
तरुणीचे अपहरण करून दोन नराधमांनी केला बलात्कार
author img

By

Published : Dec 13, 2021, 7:51 PM IST

Updated : Dec 13, 2021, 8:01 PM IST

नागपूर - नागपूर शहरातील अतिशय उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या रामदासपेठ येथून सकाळी दहा वाजताच्या सुमारास दोन आरोपीं संगनमत करून एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर त्या तरुणीवर कळमना येथे नेऊन सामूहिक बलात्कार ( Young Woman Abducted and Gang Raped ) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पिडीत तरुणी ही गाण्याच्या शिकवणी वर्गात जात असताना नराधमांनी तिचे अपहरण केले. पीडित तरुणीला त्याच अवस्थेत सोडून आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला, त्यानंतर तरुणीने कळमना पोलीस ठाण्यात जाऊन ( Rape complaint Filed Kalamna police station ) तक्रार नोंदवली आहे. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची प्रतिक्रिया

निर्जनस्थळी नेऊन केला आळीपाळीने अत्याचार -

पीडित तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील फेटरी येथील रहिवासी आहे. ती रोज कॉलेज आणि गाण्याच्या शिकवणी वर्गासाठी नागपुरला येत असते. दुपारी ती लहान मुलांची शिकवणी घेतल्यानंतर संध्याकाळी घरी जायची. रोजच्या प्रमाणे आज सकाळी नागपूरला आली. रामदासपेठ भागातून पायी जात असताना दोन आरोपींनी त्या तरुणीचे अपहरण करून तिला कळमना परिसरातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

मित्राच्या मदतीने गाठले पोलीस ठाणे -

दोन्ही आरोपी पीडित तरुणीला घटनास्थळावर त्याच अवस्थेत सोडून पळ काढला, त्यानंतर पाडीत तरुणीने तिच्या मित्राला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. दोघांनी थेट कळमना पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीने सांगितलेल्या वर्णनाच्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - Parents sell Baby Girl : पोटच्या मुलीचाच केला दीड लाखांत सौदा; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

Last Updated : Dec 13, 2021, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.