नागपूर - रॅप गायक यो हनी सिंग यांनी (Yo Yo Honey Singh Case) युट्युबर अश्लील व्हिडिओ 2014 मध्ये अपलोड केले होते. त्याप्रकरणात 2015 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणासंदर्भात आज (रविवारी) आवाजाचे सॅम्पल देण्यासाठी यो यो हनिसिंग हे नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन (Kotwali Police station) येथे दाखल झाले होते. त्यांची सुमारे चार तास चाललेल्या प्रक्रियेमध्ये सॅम्पल घेण्यात आले. एसीबीचे व्हाईस तज्ञ यांच्या उपस्थितीत हे सॅम्पल गोळे घेण्यात आले होते.
2015 मध्ये दाखल झाला गुन्हा
युट्युबवर अश्लील गाणे अपलोड केल्याप्रकरणी 2015 मध्ये पाचपावली पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयाने व्हाईस सॅम्पल देण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. यासाठी रविवारी पहाटे यो यो हनी सिंग यांचे वकील हे पाचपावली पोलिस स्टेशन येथे दाखल झाले होते. यामध्ये अश्लीलता पसरवणे आणि आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यो यो हनी सिंग रविवारी व्हाईस सॅम्पल देणार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हनी सिंग कोतवाली पोलिस स्टेशन येथे दुपारी 2 वाजता दाखल झाले. सुमारे 4 तास चाललेल्या प्रक्रियेमध्ये कोतवाली पोलिसांनी हानीसिंग यांच्याकडून 3 सॅम्पल घेतले.
हेही वाचा - Yo Yo Honey Singh Case : आज नागपूर पोलीस हनीसिंगच्या आवाजाचे नमुने घेणार? वकील नागपुरात पोहोचले