ETV Bharat / city

नागपुरात पार्किंगच्या वादातून महिलेची हत्या; आरोपीला अटक - नागपुरात महिलेची हत्या

नागपुरात पार्किंगच्या वादातून शेजाऱ्यानेच महिलेची हत्या केली आहे. ही घटना शहरातील नंदनवन भागात घडली. प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

woman murdered in nagpur over parking issue
नागपुरात पार्किंगच्या वादातून महिलेची हत्या
author img

By

Published : Jun 25, 2020, 2:39 PM IST

नागपूर - शहरातील नंदनवन भागात एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पार्किंगच्या वादातून आरोपी बंटी याने धारधार शस्त्राने वार करून महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. आरती गिरडकर असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी बंटीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा गुन्हेगार वृत्तीचा असून त्याच्यावर या पूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरती गिरडकर आणि आरोपी बंटी उर्फ एकनाथ टापरे एकमेकांच्या शेजारी राहतात. रात्री दुचाकी पार्क करण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्याचवेळी अचानक आरोपी बंटी याने त्याच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने आरती यांच्यावर सपासप वार केले, ज्यामध्ये आरती यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.