ETV Bharat / city

नवरा इंजिनिअर, पगार १.५ लाख, तरीही बायकोने रचला १ Cr खंडणीचा कट - नागपूर लाईव्ह

शीतल इटनकर या महिलेला स्वतःच बुटीक सुरू करण्याची इच्छा होती, त्याकरिता तिने नवऱ्याकडे पैशाची मागणी सुद्धा केली, मात्र आधीच नवीन घर बांधल्यामुळे कर्जाचा डोंगर झाल्याने तिच्या नवऱ्याने पैसे देण्यास नकार दिला. या दरम्यान ती महिला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज बघत होती, तिच्या मनातील महत्त्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने परिचीतअसलेले डॉक्टर तुषार पांडे यांना कुरिअर मार्फत धमकीचे एक पत्र पाठवले ज्यात तिने एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

WOMAN DEMANDS ONE CRORE RANSOM FROM DOCTOR
नागपुरात महिलेने केली एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
author img

By

Published : Jun 17, 2021, 10:41 AM IST

Updated : Jun 17, 2021, 1:37 PM IST

नागपूर - शासकीय विभागात अभियंता असलेल्या एका इसमाच्या पत्नीने चक्क नागपूरात डॅाक्टर दाम्पत्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. एक कोटी रुपये न दिल्यास मुलाच्या अपहरणाची धमकी त्या महिलेने दिली होती. या घटनेची तक्रार दाखल होताच नागपूर शहरातील बेलतरोडी पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. शीतल इटनकर असे त्या महिलेचे नाव असून ती देखील फॅशन डिझायनर आहे. घर खर्च भागात नसल्याने तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे, महत्वाचे म्हणजे तिच्या नवऱ्याचा पगार दीड लाख रुपये आहे.

हेही वाचा- सोनू सुदला मुंबई हायकोर्टाने फटकारले, "संकटकाळात तुम्ही एखादा देवदूत असल्यासारखा वावर होता"

कुरिअर मार्फत पाठवले धमकीचे पत्र -

शीतल इटनकर या महिलेला स्वतःच बुटीक सुरू करण्याची इच्छा होती, त्याकरिता तिने नवऱ्याकडे पैशाची मागणी सुद्धा केली, मात्र आधीच नवीन घर बांधल्यामुळे कर्जाचा डोंगर झाल्याने तिच्या नवऱ्याने पैसे देण्यास नकार दिला. या दरम्यान ती महिला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज बघत होती, तिच्या मनातील महत्त्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने परिचीत असलेले डॉक्टर तुषार पांडे यांना करिअर मार्फत धमकीचे एक पत्र पाठवले ज्यात तिने एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. एक कोटी रुपये न दिल्यास मुलाच्या अपहरणाची धमकी त्या महिलेने दिली होती.

हेही वाचा- आगळे-वेगळे गाव!!! आजही घरांना आणि बँकेलाही नाहीत दरवाजे

वेबसीरीज पाहून आखली होती अपहरणाची योजना -

लॉकडाऊनच्या काळाला मिळालेल्या फावल्या वेळेत नागरिकांमध्ये वेब सिरीज बघण्याचा छंद मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या वेबसिरीजचे साईड इफेक्ट्स देखील आता पुढे येऊ लागले आहेत. शीतल इटनकर आणि तिच्या पतीला काही महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता, त्यांनी डॉक्टर पांडे यांच्याच रुग्णालयात उपचार घेतले, त्यावेळी शीतल ने डॉक्टरला किती मुले आहेत, त्यांच्या संपत्तीची व्याप्ती किती आहेत. ते एक कोटी रुपये देऊ शकतील का या सर्व बाबींचा अभ्यास केला होता.

हेही वाचा- हातावर मेहंदी लागन्याआधीच कोरोनाने केला घात, आईनंतर अवघ्या १० दिवसांत मुलीचंही निधन

बुटीक सुरु करण्यासाठी पैसे हवे म्हणून मागितली खंडणी -

शीतल इटनकरने फॅशन डिझायनरचा अभ्यास पूर्ण केला होता. तिला स्वतःचे बुटीक सुरु करण्यासाठी पैसे हवे होते. पण नवऱ्याला मिळणाऱ्या दीड लाख पगारातून बऱ्यापैकी रक्कम घरासाठी घेतलेले लोनच्या कुस्त मध्ये जातात. उरलेल्या पैशातून घर खर्च भागवल्यानंतर फार काही शिल्लक पडत नसल्याने त्या महिलेने डॉक्टर दाम्पत्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - नागपुरात ब्रँडच्या नावाखाली भेसळयुक्त तेलाची निर्मिती, तिघांवर गुन्हा दाखल

Last Updated : Jun 17, 2021, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.