ETV Bharat / city

Woman Arrested for Murder her Husband : पतीची हत्या करुन आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पत्नीस अटक - मृत धर्मेंद्र नरेश गजभिये

अल्पवयीन मुलीच्या मदतीने नवऱ्याचा गळा आवळून हत्या केल्यानंतर नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या महिलेचे बिंग फुटले आहे. नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी पारडी पोलिसांनी ( Nagpur Police ) निशा गाजभिये, या महिलेला अटक केली आहे तर तिच्या अल्पवयीन मुलीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त
पोलीस आयुक्त
author img

By

Published : Apr 18, 2022, 4:39 PM IST

नागपूर - अल्पवयीन मुलीच्या मदतीने नवऱ्याचा गळा आवळून हत्या केल्यानंतर नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या महिलेचे बिंग फुटले आहे. नवऱ्याची हत्या केल्याप्रकरणी पारडी पोलिसांनी निशा गाजभिये, या महिलेला अटक केली आहे, तर तिच्या अल्पवयीन मुलीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस आयुक्त

11 एप्रिलला या घटनेतील मृत धर्मेंद्र नरेश गजभिये ( वय 40 वर्षे ) चे त्याची पत्नी निशासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी संतापलेल्या निशाने तिच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने धर्मेंद्रचा गळा आवळून हत्या केली. नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार निशाने पारडी पोलीस ठाण्यात ( Nagpur Police ) दाखल केली होती. मात्र, हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्रने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंंतर पारडी पोलिसांनी निशाला अटक केली आहे. तर तिच्या अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय - निशाचा नवरा हा ट्रक ड्राइव्हर असल्याने तो सतत बाहेर राहायचा. या दरम्यान निशाचे बाहेर सूत जुळल्याचा संशय धर्मेंद्रला आला, त्यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. त्यातूनच निशाने मुलीच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केल्याचा खुलासा झाला आहे.

हेही वाचा - Nagpur Bolero Accident : नागपूरमध्ये बोलरो-दुचाकीची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.