नागपूर - विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जागेसंदर्भात कुठलाही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे त्यावर चर्चाच झाली नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Nagpur legislative council Election ) यांनी सांगितले. भाजप घाबरली असून यात काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असेही पटोले म्हणाले.
नागपूरच्या सक्करदार परिसरातील कमला नेहरू विद्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माहिती दिली.
हेही वाचा-भाजपाने ओबीसी समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला - नाना पटोले
भाजप घाबरलेली आहे, त्यांचा मतदारांवर विश्वास नाही...
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर कोणाकडे किती नंबर जास्त आहे याला काही महत्त्व नाही. यात भाजपचे नगरसेवक यांना पर्यटनावर नेण्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना भाजप किती घाबरलेली दिसत आहे. त्यांच्या मतदारांवर भाजपचा विश्वास राहिलेला नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. ते आपले नगरसेवक हे नॉट रीचेबल करत आहेत. हे लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole slammed BJP over election ) भाजपवर केली आहे.
हेही वाचा-Fuel Price : राज्य सरकारनेही इंधनावरील व्हॅट कमी करावा - नाना पटोले
महाविकास आघाडीमध्ये दरार येणारे कुठलेही वक्तव्य केले नाही...
काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुखावले आहेत. काँग्रेसकडून निवडणुकीसंदर्भात आम्हाला मान मिळत नाही, असा काही राष्ट्रवादीच्या नेत्यांना आरोप करत काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. यावर नाना पाटील म्हणाले, हा उमेदवार महाविकास आघाडी सरकारचा आहे. महाविकास आघाडीत कुठलीही अडचण नाही. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसचे छोटू भोयर जिंकतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.
हेही वाचा-Vidhan Parishad Election : 4 जागा बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न - पटोले
बैठकीला हे नेते होते उपस्थित
कमला नेहरू विद्यालयातील बैठकीला काँग्रेस नेते ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, शहर अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे, आमदार राजू पारवे, आमदार अभिजत वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक उपस्थित होते. तसेच कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नाना गावंडे, नगरसेवक प्रफुल गुळडे पाटील ( Praful Gulde form for election ) हे उपस्थित होते. दुसरे उमेदवार म्हणून नामांकन दाखल केलेल्या प्रफुल गुळडे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची चर्चा आहे.