ETV Bharat / city

विधानसभा निवडणूक : नागपुरात काँग्रेसचे अस्तित्व टिकणार का? - विधानसभा निवडणूक निकाल

गेल्या २१ ऑक्टोबरलाच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नागपुरात एकूण १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आपले अस्तित्व टिकवण्यात यशस्वी ठरणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात काँग्रेसचे अस्तित्व टिकणार?
author img

By

Published : Oct 23, 2019, 8:31 AM IST

Updated : Oct 23, 2019, 12:06 PM IST

नागपूर - विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया २१ तारखेलाच पार पडली आहे. मात्र, आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागलेली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी फक्त एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र, २०१९ ची निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. कारण काँग्रेस आपली एक जागा टिकवून इतर जागा जिंकणार का? की हीपण जागा गमावणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसला किती जागा मिळतील? याचे चित्र २४ तारखेलाच स्पष्ट होईल.

which 12 MLA will elected from all constituencies
२०१४ चे चित्र

२०१४ V/S २०१९ निवडणूक -

सावनेर विधानसभा मतदारसंघ, काँग्रेस गड राखणार का?

गेल्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार सुनील केदार निवडून आले होते. नागपूर जिल्ह्यातील एकूण १२ मतदारसंघापैकी फक्त या मतदारसंघावर काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे विजय जीवतोडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, सुनील केदार यांनी ९ हजार २०९ मतांनी जीवतोडेंचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये मात्र याठिकाणी भाजपने आपला उमेदवार दिला आहे. भाजपचे राजीव पोतदार, तर काँग्रेसकडून सुनिल केदारच निवडणूक लढवत आहेत. मात्र, आता गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केलेले सुनिल केदार यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या पोतदारांना आस्मान दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघ -
गेल्या २०१४ मध्ये या मतदारसंघातून भाजपकडून आशिष देशमुख निवडून आले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख रिंगणात होते. मात्र, त्यांचा ५ हजार ५५७ मतांनी देशमुख यांनी पराभव केला होता, तर तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र हरणे होते.
आशिष देशमुख यांनी आमदारकी आणि भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्र्यांना वाटत होते. मात्र, तसे न होता भाजपकडून चरणसिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली, तर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यंदाही रिंगणात होते. मात्र, आता कोणाचं पारडं वरचढ ठरेल? हे उद्या स्पष्ट होणारच आहे.

हिंगणा विधानसभा मतदारसंघ -
या मतदारसंघातून भाजपचे समीर मेघे विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेशचंद्र बंग यांचा २३ हजार मतांनी पराभव केला होता.
आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपकडून समीर मेघे रिंगणात होते, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे विजय घोडमारे यांनी निवडणूक लढवली. दोघांमध्ये देखील तुल्यबळ लढत असल्याने दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सभा या मतदारसंघात घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता जनता कोणाला आपला आमदार बनवणार? हे २४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

उमरेड विधानसभा मतदारसंघ -
गेल्या २०१४ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे सुधीर पारवे विजयी झाले होते. त्यांनी ५८ हजार मतांनी बसपचे रुक्षदास बनसोड यांचा पराभव केला होता, तर राजू पारवे हे अपक्ष उमेदवार तिसऱ्या स्थानावर होते.
यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपकडून सुधीर पारवेच पुन्हा रिगंणात आहेत. या दोन भावातच खरी चुरशीची लढत आहे. त्यामुळे या मतदारसंघातल्या लढतीकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

कामठी विधानसभा मतदारसंघ -
गेल्या २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांचा ४० हजार मतांनी पराभव केला होता.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट केला. त्यांच्याजागी टेकचंद सावरकर यांना तिकीट दिले. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून सुरेश भोयर यांनी निवडणूक लढवली. मात्र, आता याठिकाणी नवखा उमेदवार भाजपचा गड राखणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रामटेक विधानसभा मतदारसंघ -
शिवसेनेचा गड असलेल्या या मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपच्या उमेदवाराने मुसंडी मारली होती. भाजपच्या डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी १२ हजार मतांनी शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांचा पराभव केला होता. तर काँग्रेसचे सुबोध मोहिते तिसऱ्या स्थानावर होते.
यंदा या मतदारसंघात भाजपकडून डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी निवडणूक लढवली, तर काँग्रेसकडून उदयसिंग सोहनलाल यादव रिंगणात होते. शिवाय शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला याचा फटका बसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपुरात काँग्रेसचे अस्तित्व टिकणार का?

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ -
गेल्या २०१४ च्या निवडणुकीत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रफुल गुडधे पाटील यांचा ५८ हजार मतांनी पराभव केला होता, तर तिसऱ्या स्थानावर बसपचे उमेदवार राजेंद्र पडोळे होते.
यंदा या मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसवासी झालेले आशिष देशमुख यांना काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रिंगणात उतवरले होते. त्यामुळे पूर्वी भाजपचे नेते असलेले देशमुख मुख्यमंत्र्यांची मते आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी होतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच ही लक्षवेधी लढत असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूर दक्षिण मतदारसंघ -
गेल्या २०१४ मध्ये या मतदारसंघातून भाजपच्या सुधाकर कोहळे यांनी काँग्रेसच्या सतिश चुतर्वेदी यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला होता.
यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी खेळी करत नवीन उमेदवार दिले होते. भाजपकडून मोहन मते यांनी निवडणूक लढवली, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे गिरीश पांडव रिंगणात होते. मात्र, याठिकाणी काँग्रेसच्याच प्रमोद मानमोडे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आता त्याचा फटका कोणाला बसणार? हे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपूर पूर्व मतदारसंघ -
२०१४ मध्ये भाजपकडून कृष्णा खोपडे यांनी ४८ हजार मतांनी काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांचा पराभव केला होता.
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार बदलून पुरुषोत्तम हजारे यांना रिंगणात उतरवले होते. त्यांच्याविरोधात भाजपकडून कृष्णा खोपडे यांनीच निवडणूक लढवली. मात्र, आता काँग्रेसच्या उमेदवार बदलीचा खोपडे यांना फटका बसेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपूर मध्य मतदारसंघ -
२०१४ मध्ये या मतदारसंघातून भाजपच्या विकास कुंभारे यांनी काँग्रेसच्या अनीस अहमद यांचा ३८ हजार मतांनी पराभव केला होता.
यंदा या मतदारसंघात देखील काँग्रेसने उमेदवार बदलून हृषीकेश शेळके यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यांच्याविरोधात भाजपच्या कुंभारे यांनीच निवडणूक लढवली. याठिकाणी देखील नवीन उमेदवाराचा फटका कुंभारेंना बसतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपूर पश्चिम मतदारसंघ -
२०१४ ला या मतदारसंघातून भाजपच्या सुधाकर देशमुख यांनी २६ हजार मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा पराभव केला होता.
यंदाच्या निवडणुकीत देखील याच दोन्ही उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. मात्र, गेल्या निवडणुकीत काही मतांनी पराभव झालेले ठाकरे सुधाकर देशमुखांपेक्षा वरचढ ठरतील का? हे २४ तारखेलाच ठरणार आहे.

नागपूर उत्तर मतदारसंघ -
२०१४ ला या मतदारसंघातून डॉ. मिलिंद माने यांनी बसपच्या किशोर गजभिये यांचा फक्त १३ हजार मतांनी पराभव केला होता, तर काँग्रेसचे नितीन राऊत तिसऱ्या स्थानावर होते.
यंदाच्या निवडणुकीत देखील डॉ. मिलिंद माने आणि काँग्रेसकडून नितीन राऊत यांच्यामध्येच थेट लढत होती. मात्र, नितीन राऊत यांच्या उमेदवारीला काही काँग्रेस कार्यकर्त्यांचाच विरोध होता. तरीही काँग्रेसकडून त्यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, आता कार्यकर्त्यांच्या रोष पत्करून निवडणूक लढलेले राऊत यशस्वी ठरतात, की मिलिंद माने यांनाच जनता आमदार म्हणून पसंती देते? हे २४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

महत्वाच्या लढती -
संपूर्ण राज्यामध्ये नागपूर-दक्षिण पश्चिम मतदारसंघातील लढत सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. कारण या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या रिंगणात. त्यांच्याविरोधात काँग्रेसवासी झालेले आशिष देशमुख होते. त्यामुळे पुन्हा फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्याची परिस्थिती -
यंदाच्या निवडणुकीत 57.44 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात दोन ठिकाणी बंडखोरी देखील करण्यात आली आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळेंना कामठीमधून उमेदवारी नाकारल्यामुळे तेली समाजाच्या मतदारांमध्ये नाराजी होती. याचा फटका देखील भाजपला बसण्याची शक्यता आहे. तसेच सावनेर आणि काटोलमध्ये आघाडीचे उमेदवार येण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ उमरेड विधानसभेमध्ये देखील तुल्यबळ लढत आहे. याठिकाणी काँग्रेस उमेदवार राजू पारवेंचा प्रभाव निर्माण झाला आहे. तसेच सुधीर पारवेंचा देखील तेवढाच प्रभाव आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे जाणार की भाजपकडे? याबाबत संभ्रम आहे. शिवाय रामटेमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ५ मतदारसंघात भाजप वरचढ ठरणार की काँग्रेस? हे उद्याच ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 23, 2019, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.