ETV Bharat / city

संचारबंदी संदर्भात नागपूरकरांच्या मनात नेमकं आहे तरी काय? - nagpur lockdown news

उपराजधानी नागपुरात वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे परत एकदा नागपूरकरांवर संचारबंदीचे बंधन लादण्यात आली आहेत.

nagpur
नागपूर
author img

By

Published : Mar 17, 2021, 3:15 PM IST

Updated : Mar 17, 2021, 5:38 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपुरात वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे परत एकदा नागपूरकरांवर संचारबंदीचे बंधन लादण्यात आली आहेत. या परिस्थितीसाठी प्रत्येक नागपूरकरांची बेफिकिरी आणि बेजबाबदारपणा कारणीभुत आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. गेल्यावर्षी ११ मार्चला नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यावेळी नागरिकांना स्वतःच्या जीवाची चिंता होती. मात्र, कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतर चित्र बदलेल आहे. आता नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच नागपुरात कोरोनाचा विळखा वाढला आहे. या संदर्भात काही नागरिकांसह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी घेतलेला आढावा

नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे याची जाणीव नागपूरकरांना आहे. मात्र, नियम पाळण्याची इच्छा त्यांच्यात नसल्याचं देखील दिसून येत आहे.

हेही वाचा - 'त्या' मर्सिडीजचा मूळ मालक धुळ्यातील; फेब्रुवारीतच विकली होती कार

संचारबंदी हा पर्याय नाही- सामान्य नागरिक

प्रशासनाच्या मनात येईल त्यावेळी संचार बंदीचा निर्णय घेतला जातो मात्र,त्यामुळे सर्वसामान्यांसह गोरगरिबांचे किती नुकसान होतं याचा अंदाज कोणीही घेत नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे. नागपूर शहरात कोरोना वाढतो आहे हे सत्य असलं तरी त्यावर संचारबंदी हा पर्याय ठरू शकत नाही असं देखील मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्याऐवजी प्रसासनने जनसामान्यांचे हित लक्षात घेऊन प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे काही जण म्हणत आहेत.

पोलीस यंत्रणा सज्ज, मात्र नागरिकांचा प्रतिसाद नाही

गेल्या तीन दिवसंपासून नागपूरच्या प्रत्येक मोठ्या चौकात पोलीस कर्मचारी तैनात आहेत,मात्र लोकांकडून त्यांना सहकार्य मिळत नसल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारत कडे बोलून दाखवलं आहे. आज ही नागरिक तोंडावर मास्क न लावता फिरताना दिसून येत आहेत. पोलिसांची भीती म्हणून नाही तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाचा खेळ होऊ नये या करिता प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे,हे पटवून देताना अनेक बेजबाबदार नागरिक हुज्जत घालतात,त्यामुळे आम्हाला देखील दंडात्मक कारवाई करणे भाग पाडत असल्याचं मत पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड; जीन्स-टीशर्ट बंद! सरकारकडून अध्यादेश जारी

लोकांनी नियम पाळावेत- मनपा कर्मचारी

कोरोना विषाणूंना प्रतिबंध घालायचा असेल तर प्रत्येकाने नियम पाळलेच पाहिजे असं मत महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. रोज शंभर-दोनशे नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्याने हा प्रश्न सुटणार नसल्याचं दिसून येत आहे. परिस्थिती अशीच बिकट होत गेल्यास गेल्यावर्षी प्रमाणे कर्फ्यु लावण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नसल्याचं मत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Mar 17, 2021, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.