ETV Bharat / city

नागपूर शहराला जगाचा पटलावर नावलौकिक मिळेल या दिशेने काम करू - नितीन राऊत - Republic Day 2021

शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

नितीन राऊत
नितीन राऊत
author img

By

Published : Jan 26, 2021, 3:17 PM IST

नागपूर - नागपूर शहर जगाचा आणि देशाच्या पटलावर चांगलं शहर, उत्तम शहर म्हणून नाव लौकिक व्हावे, या दिशेने आम्ही पाऊल उचलत असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले. ते शासकीय ध्वजारोहणानंतर माध्यमांशी बोलत होते. शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री ऊर्जामंत्री यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

कोरोनाचे वर्ष आयुष्यातून काढून टाकण्या सारखेच-

मागचे वर्ष हे आयुष्यातून काढून टाकण्यासारखे आहे. सर्वच विकास कामे आपापल्या ठिकाणी थांबलेली आहे. परंतू आता नागपूर शहराचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रलंबित योजना आहेत. त्यांना पुन्हा चालना द्यायची आहे. याची सुरवात म्हणून आज गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचे नामकरण स्वतः मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे माहिती ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले.

नितीन राऊत
राऊत म्हणाले, विज वितरण विभागात जवळपास साडेसात हजार जागा निघाल्या होत्या. त्या सर्वांच्या लेखी परीक्षा झाल्या आहे. प्राथमिक परीक्षा झाल्या, त्याची चाचणी झाली आहे. सगळे डॉक्युमेंट तपासण्यात आले आहेत. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. यात सर्वांना सामावून घ्यायचे आहे.

दोन पोलीस कर्मचाऱ्यांना भोवळ-

ध्वजारोहना दरम्यान नागपुरात प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी उभे असलेल्या दोन पोलीस कॅान्स्टेबलला भोबळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. सकाळी 8.30 वाजतापासून ते उभे होते. प्रकृती बिघडल्याने त्याना भोवळ आली असावी. लक्ष्मण कदम, आशिष बागडे असे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे नावे आहेत.

हेही वाचा- पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.