ETV Bharat / city

Vijay Wadettiwar: मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा ऐकून आम्ही थकलो -विजय वडेट्टीवार - Vijay Wadettiwar On Goverment

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन आता एक महिना लोटला आहे. तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, ही चर्चा ऐकून-ऐकून आम्ही थकलो आहोत असा टोला माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस यांना लावला आहे.

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jul 31, 2022, 6:18 PM IST

नागपूर - दोघांच्या या सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. आता बहुतांशी शेतकरी आता फक्त रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकरी खचले आहेत. शेतकऱ्यांना आधार म्हणून राज्य सरकारने तात्काळ ५० हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार

तातडीने पंचनामे करणे शक्य - मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल या चर्चेत न अडकता विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. आता विदर्भात सर्वत्र पाऊस थांबला आहे, त्यामुळे तातडीने पंचनामे करणे शक्य असून प्रशासनाने ती कारवाई लवकर करावी असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राऊत एजंट होते; नवनीत राणा यांचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.