ETV Bharat / city

दुष्काळाच्या झळा: नागपूरच्या सीमाभागातील रहिवाशांची पाण्यासाठी वणवण - development

नागपूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून झपाट्याने प्रगती करत आहे.  मध्यंतरी शहरालागत असलेल्या ग्रामीण नागपूरचा काही भाग शहरात समाविष्ट झाल्याने महानगरपालिकेवर सर्वांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आली आहे.

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
author img

By

Published : May 10, 2019, 5:42 PM IST

नागपूर - नदी, तलाव आणि धरणांनी समृद्ध असा नागपूरला सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शहराच्या सीमेवर राहणाऱ्या नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. कधीकाळी पाणीदार असलेल्या नागपुरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

नागपूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या भागात नवीन नागपूरचा विस्तार होत आहे. त्या भागात मात्र नागरिक सुविधांचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नवीन विस्तारित नागपूरमध्ये पाण्याच्या पाईप लाईन्सचे जाळे अद्याप निर्माण झाले नसल्यानेच या भागात टँकरने पाणी पुरवठा होत असून, पाच दिवसातून एकदा पाणी मिळत आहे.

नागपूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून झपाट्याने प्रगती करत आहे. मध्यंतरी शहरालागत असलेल्या ग्रामीण नागपूरचा काही भाग शहरात समाविष्ट झाल्याने महानगरपालिकेवर सर्वांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आली आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती करताना महानगर पालिकेने सर्वात आधी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे जाळे निर्माण करण्याची गरज होती, मात्र अद्यापही पाणीपुरवठा करणारी यंत्रणाच निर्माण न झाल्याने परिसरातील नागरिकांना आधी पाण्याची सोय करून मग पोटाची सोय करण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.

नरसाळा, हुडकेश्वरसह परिसरातील भाग हे नागपूर महापालिकेमध्ये समाविष्ट झाले आहे. या परिसरात अद्याप पिण्याचे पाईपलाईन पोहचले नाही, काही भागात पाईपलाईन टाकल्या गेल्या मात्र त्याचे कनेक्शन दिले नाही, त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. असे महापालिकेच्या पाणी समितीचे अध्यक्ष सांगत आहेत. शहरात सगळीकडे पाणी समस्या नसून काही भागातच पाण्याची समस्या असलेय्चा महापालिक सांगते. नवीन भागात ३८७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा पाच दिवसातून एकदा नियमित होत असला तरी एवढे पाणी पुरत नाही, त्यामुळे आमच्या भागात लवकर पाणी पुरवठ्याची व्यवस्था करा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Intro:नदी,तलाव आणि धरणांनी समृद्ध नागपूर जिल्हा पाण्यासाठी वणवन भटकतोय.... कधीकाळी पाणीदार असलेल्या नागपुरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...नागपूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठा होतो आहे.... ज्या भागात नवीन नागपूरचा विस्तार होतोय त्या भागात मात्र नागरिक सुविधांचा मोठा अभाव निर्माण झालाय,ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी समस्या डोकं वर काढत असून परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे ... नवीन विस्तारित नागपूर मध्ये पाण्याच्या पाईप लाईन्सचे जाळे अद्याप निर्माण झाले नसल्यानेच या भागात टँकरने पाणी पुरवठा होत असला तरी पाच दिवसातून एकदा पाणी मिळत आहेBody:आजच्या दिवशी नागपूर शहरात पाणी समश्या फार नसली केवळ १० जून पर्यंतच पाणी साठा पुरेल अशी माहिती पुढे आल्यानंतर प्रत्येक नागपूरकरांना भविष्याचा विचार करावा लागेलच..... त्यातल्या त्यात नागपूर शहर विकासाच्या दृष्टिकोनातून झपाट्याने प्रगत करत असल्याने शहर चहू बाजूने विस्तारित आहे.....मध्यंतरी शहरा लागत असलेल्या ग्रामीण नागपूरचा काही भाग शहरात समाविष्ट झाल्याने महानगर पालिकेवर नागरी सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आली आहे.... पायाभूत सुविधांची निर्मिती करताना महानगर पालिकेने सर्वात आधी पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन चे जाळे निर्माण करण्याची गरज होती,मात्र अद्यापही पाणी पुरवठा करणारी यंत्रणाच निर्माण न आल्याने परिसरातील नागरिकांना आधी पाण्याची सोय करून मग पोटाची सोय करण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे....
बाईट- महिला
बाईट -महिला
नरसाळा, हुडकेश्वर सह अनेक भागात नागपूर महापालिकेत समाविष्ट झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घर बांधून नागरिक राहायला लागले .. मात्र या परिसरात अजून पर्यंत नळाच्या लाईन पोहचल्या नाही काही भागात लाईन टाकल्या गेल्या मात्र त्याचे कनेक्शन झाले नाही त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा केल्या जात असल्याचं महापालिकेच्या पाणी समितीचे अध्यक्ष सांगतात ...
बाईट -पिंटू झलके -- पाणी पुरवठा सभापती नागपूर महापालिका ,
शहरात पाणी समश्या नसली तरी अनेक भागात पाणी वाटपाची समश्या असल्याचं महानगर पालिका स्वतः मान्य करते . तर नवीन भागात ३८७ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे ... हा पाणी पुरवठा पाच दिवसातून एकदा नियमित होत असला तरी एवढं पाणी पुरत नाही त्यामुळे आमच्या भागात लवकर पाणी पुरवठ्याची व्यवस्था करा अशी मागणी नागरिक करत आहे. Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.