ETV Bharat / city

'समाजातील मतभेद वाढू नये ही काँग्रेसची भूमिका' - vijay wadettiwar latest news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगरचा उल्लेख केला. त्यावर विचारले असता मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, समाजातील कोणत्याही घटकांचे मन कलुषित होणार नाही, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jan 7, 2021, 10:23 PM IST

Updated : Jan 7, 2021, 10:49 PM IST

नागपूर- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला औरगांबादचा उल्लेख 'औरंगाबाद' असाच उल्लेख केला. आता ते संभाजीनगर लिहितात. हे सगळे आपल्या राजकारणाच्या दृष्टीने करतात, अशी टीका मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. ते नागपूर येथील समाज कल्याण विभागातील महाज्योती संस्थेच्या बैठकीदरम्यान बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगरचा उल्लेख केला. त्यावर विचारले असता मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, समाजातील कोणत्याही घटकांचे मन कलुषित होणार नाही, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. अशा पद्धतीने पुढे गेले पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात कोणताही धर्म असो एक दिलाने एक मनाने या राज्यात नांदावे. कुठलेही निर्णय सामंजस्याने एकमेकाला विश्वासात घेऊन केले तर कुठेही अडचणींचा विषय येत नाही, असेही ते म्हणाले.

समाजातील मतभेद वाढू नये ही काँग्रेसची भूमिका

हेही वाचा-औरंगाबादचे नाव खोडून लिहिले संभाजीनगर; रेल्वे स्थानकावर अज्ञातांचा प्रताप

पुढे ते म्हणाले की, संभाजी महाराजांचे नाव प्रचंड मोठे आहे. त्यांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. पण संभाजी महाराजांबरोबर जे लोक त्यावेळी होते, तेसुद्धा कोण होते हा इतिहास सांगण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने संभाजी महाराजांना क्रूरतेने हाल करून मारण्यात आले. त्या परिस्थितीत त्यांच्या शरीराचे भाग गोळा करून समाधी बांधण्याची हिंमत बहुजन समाजातील लोकांनी दाखवली आहे. हा सुद्धा इतिहास आहे. तो लपलेला नाही. यामुळे नावाची अस्मिता आहे. ती असायलाही पाहिजे. पण छत्रपती शिवरायांनी विविध 18 जातींना घेऊन स्वराजाची स्थापना केली. यात मुस्लिमासंह दलित व सगळे समाजाचे होते. या समाजातील मतभेद व मतभिन्नता वाढू नये, हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.

हेही वाचा-'संभाजीनगर' ला काँग्रेसचा पाठिंबा नाहीच; बाळासाहेब थोरातांनी मांडली काँग्रेसची भूमिका

राज्यात सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राजकारण तापू लागले आहे. त्यातच सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला ठणकावून विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराच्या विषयावरून थेट माहिती व महासंचानलायाला धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राज्यातील अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मराठा समाजाच्या संघटनांकडून थोरात यांच्या विरोधात आंदोलनेही केली आहेत. मात्र, तरीही काँग्रेस शहरांच्या नामांतराविरोधात ठाम आहे.

Last Updated : Jan 7, 2021, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.