नागपूर - मागील काही दिवसांमध्ये महाज्योतिच्या बद्दल बदनामी करत ओबीसी समाजांच्या विद्यार्थ्यांनमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेत. ते नागपूरात महाज्योतिच्या तिसरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी पैसे आलेच नसताना, परत जाण्याच्या वावड्या असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी समाजकल्याण कार्यालयात संचालकांची बैठक पार पडली. बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षेतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी ते म्हणाले, की महाज्योति निर्माण झाल्यापासून लॉकडाऊन, कोरोनासारख्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काम होऊ शकले नाही. आतापर्यंय संचालक मंडळाच्या दोन बैठकी झाल्या असून, आज तिसरी बैठक पार पडली. महाज्योतिला बजेटमध्ये दीडशे कोटी मंजूर झाले. अजून मिळाले नाहीत. मागील वर्षात 35 कोटी आले ते खात्यात आहेत. यात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, महाज्योति आणि सारथीला प्रत्येकी दीडशे कोटी देण्यात आले आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री यांनी महाज्योतिला दीडशे कोटी वितरित करण्याचे आदेश वित्त विभागले दिल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
महाज्योतिमधील तरतुदी..
काही लोक षडयंत्र करत, विनाकारण महाज्योति संस्थेला बदनाम करण्याचे काम करत असल्याचेही मंत्री वडेट्टीवार यावेळी म्हणाले. यात आतापर्यंत महाज्योतिमधून नागपूर फ्लाईंग क्लबला अडीच कोटी दिले आहेत. यात 20 जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे विद्यार्थी निवडताना महाज्योति संचालकांचा हस्तक्षेप होऊ नये. विभागीय आयुक्त या मुलांची निवड करणार आहेत. यामध्ये दोन मुले हुतात्मा कुटुंबातील, त्यानंतर दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील, व्हीजेएनटी अबकड म्हणून प्रत्येकी एक, एसबीसी मधून दोन, आणि उर्वरित 10 हे ओबीसी प्रवर्गातील हे विद्यार्थी असणार आहेत.
'जेईई'साठी 10 हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना एका कंपनीकडून मोफत प्रशिक्षण दिले जाणार असल्याने मोठा खर्च कमी झाला आहे. यासोबत यूपीएसीसाठी 1 हजार आणि एमपीएससीसाठी दोन हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात व्हिजेएनटीचा कोटा निश्चित केला जाणार आहे. यात पोलीस भरतीसाठी काम केले जाणार आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी 40 कोटीचा बजेट असणार आहे.
पीएचडीच्या 500 विद्यार्थ्यांना 5 वर्षांचा कालावधीसाठी 31 हजार रुपये महिना स्टायफंड दिले जाणार आहे. तर एमफिलसाठी 200 विद्यार्थ्यांना स्टायफंड म्हणून 20 हजार रुपये दोन वर्षासाठी देणार आहे.
फडणवीस-पवार भेटीवर बोलणे टाळले..
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, की राजकीय भेटी होत असतात. मीही गडकरींना भेटलो. काही कामे असतात, त्यासाठी भेटी होतात. राजकारणात प्रत्येक भेटीचा वेगळा अर्थ काढता येत नाही, असे ते म्हणाले.
यासोबत मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण नाकारले नाही. राजकीय आरक्षण हे 50 टक्क्यांच्या वर गेल्यामुळे ते रद्द करण्यात आले. आरक्षणाबद्दल सेवानिवृत्त न्यायाधिश यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमू असे सांगितले आहे. यासाठी आमची 2 दिवसांनी मुख्यमंत्री यांची सोबत बैठक आहे. त्यात तोडगा निघेल, आणि एका महिन्यात आयोग नेमला जाईल. त्या मार्फत जणगणना करून न्यायालयाला पुढे मांडण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : हेरगिरी प्रकरणावर गृहमंत्र्यांचा खासदार संभाजीराजेंना फोन; संभाजीराजेंनी ट्वीट करून दिली माहिती