नागपूर - क्रांती दिनाचे औचित्य साधून विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या कोराडी गावापर्यंत वीज मार्च काढला. आंदोलनकर्ते कोराडीमध्ये दाखल होताच पोलिसांनी अडविले आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विदर्भात विजेचे बिल निम्मे करा, शेतीचे वीजबिल माफ करा आणि विदर्भाला लोडशेडीग मुक्त करा यासह अनेक मागणीसाठी आज विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे नागपूरच्या संविधान चौकातून ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या कोराडीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
हा मार्च विदर्भवादी नेते राम नेवले यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. या मध्ये सुमारे 300 विदर्भवादी सहभागी झाले होते. सुमारे 15 किलोमीटरचे अंतर पायी चालून विदर्भवादी आंदोलनकर्ते कोराडी मध्ये दाखल झाले होते.