ETV Bharat / city

वाढीव वीज बिलांच्या विरोधात विदर्भवादी संघटना आक्रमक - nagpur protest news

आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र नागपुरात याच विषयाला धरून विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-कामठी मार्गावरील महावितरणच्या उपकेंद्रवर धडक मोर्चा काढला.

विदर्भवादी संघटना मोर्चा
वाढीव वीज बिलांच्या विरोधात विदर्भवादी संघटना आक्रमक
author img

By

Published : Nov 26, 2020, 6:14 PM IST

नागपूर - आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र नागपुरात याच विषयाला धरून विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर-कामठी मार्गावरील महावितरणच्या उपकेंद्रवर धडक मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.

वाढीव वीज बिलांच्या विरोधात विदर्भवादी संघटना आक्रमक

यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात करताच आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी सर्व विदर्भवादी आंदोलकांना ताब्यात घेतले. विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे मागील काही महिन्यांपासून वाढीव वीज बिलांच्या विरोधात सातत्याने आंदोलनं केली जात आहेत. आज देखील विदर्भवाद्यांनी पॉवर ग्रीडसमोर आंदोलन सुरू केलं. यामुळे पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला होता. आजच्या आंदोलनात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण सर्वाधिक होते.

याआधीही आंदोलनं

भारतीय जनता पक्षाने वाढीव वीज बिलांची मुद्दा हाताशी धरून आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक संघटना या विषयावरून आक्रमक झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तर ऊर्जामंत्री नितीन राऊत व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतळे देखील जाळले होते. कोरोना काळातील सर्व विदर्भातील जनतेला वीज बिलातून मुक्त करा, अशी मागणी विदर्भवादी करत आहेत.

कोरोना काळात सर्व जनता घरी होती. मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले आहेत. नोकऱ्या गेल्या आहेत. या काळात महावितरणने अव्वाच्या सव्वा वीजबिलं पाठवून जनतेचा असंतोष ओढावला आहे. पोट भरायची सोय नसल्याने वाढीव वीजबिल कधी भरणा, असा प्रश्न विदर्भवाद्यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.