ETV Bharat / city

नागपुरात गुंडांची दहशत; वाहनांची तोड-फोड सीसीटीव्हीत कैद - गाड्यांचे मोठे नुकसान

गुंडांकडून 20 च्या वर वाहनांची तोडफोड केल्याची घटना नागपूरच्या बजेरिया परिसरात घडली आहे.

वाहनांची तोड-फोड सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Aug 6, 2019, 12:48 PM IST

नागपूर - शहरात गुंडाकडून वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना आता सातत्याने घडताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी काही गुंडांनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

गुंडांकडून 20 च्या वर वाहनांची तोडफोड केल्याची घटना नागपूरच्या बजेरिया परिसरात घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बजेरिया परिसरात दुचाकी वरून आलेल्या दोन गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अनेक गाड्यांची तोडफोड केली. घराबाहेर पार्क करून ठेवलेल्या चार चाकी वाहनांचा यात समावेश आहे.

वाहनांची तोड-फोड सीसीटीव्हीत कैद

मध्यरात्री दुचाकीवर येऊन या गुंडांनी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हातात तिक्ष्ण हत्यार घेऊन रस्त्यावर दिसेल त्या गाडीवर या आरोपींनी हल्ला करून गाड्यांचे मोठे नुकसान केले. परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ल्याची ही दृश्ये चित्रित झाली आहेत. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यावर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. परंतु, या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला असून याचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात देखील वाहन तोडफोडीची अशीच घटना या परिसरानजीक घडली होती, त्यानंतर पुन्हा अशाच घटनेच्या पुनरावृत्ती झाली आहे.

Intro:नागपुरात गुंडाकडून वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना आता सातत्याने घडताना दिसत आहेत....दोन दिवसांपूर्वी काही गुंडांनी दहशत माजवऱ्यांच्या उद्देशाने तोडफोड केली असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे Body:गुंडांकडून 20 च्या वर वाहनांची तोडफोड केल्याची घटना नागपूरच्या बजेरिया परिसरात घडली आहे ... काल मध्यरात्रीच्या सुमारास बजेरिया परिसरात दुचाकी वरून आलेल्या दोन गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी अनेक गाड्यांची तोडफोड केली... घराबाहेर पार्क करून ठेवलेल्या चार चाकी वाहनांचा यात समावेश आहे... मध्यरात्री दुचाकीवर येऊन या गुंडांनी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला... हातात तीक्ष्ण हत्यार घेऊन रस्त्यावर दिसेल त्या गाडीवर या आरोपींनी हल्ला करून गाड्यांचे मोठे नुकसान केले... परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ल्याची ही दृश्ये चित्रित झाली आहेत... हल्ल्या नंतर परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते... घटनेची तक्रार पोलिसांकडे करण्यात आल्यावर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले... परंतु या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला असून याचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.... विशेष म्हणजे गेल्या महिन्यात देखील वाहन तोडफोडीची अशीच घटना या परिसरा नजीक घडली होती, त्यानंतर पुन्हा अशाच घटनेच्या पुनरावृत्ती झाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.