ETV Bharat / city

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपुरात वंचित बहुजनचे 'धरणे', जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

author img

By

Published : Dec 17, 2020, 3:15 PM IST

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून विविध संघटनांचा पाठिंबा मिळतोय. याच पार्श्वभूमीवर नागपुरातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत 'धरणे' करण्यात आले.

nagpur protest news
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपुरात वंचित बहुजनचे 'धरणे', जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नागपूर - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून विविध संघटनांचा पाठिंबा मिळतोय. याच पार्श्वभूमीवर नागपुरातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत 'धरणे' करण्यात आले. वीस दिवस उलटल्यानंतरही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील संविधान चौकात हे आंदोलन पार पडले.

शेतकऱ्यांची हाक केंद्र सरकारपर्यंत जावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच तीनही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

केंद्र सरकारकडून आंदोलनाची दखल का नाही

केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील २०-२१ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर शेतकरी समर्थनार्थ धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अशावेळी तीनही काळे कायदे रद्द करावे. अशी मागणीही या आंदोलकांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारला आमच्या शेतकऱ्यांची व्यथा पोहोचावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जोरदार घोषणाबाजी

यावेळी काळे कायदे रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणाही देण्यात आल्या. तसेच केंद्र सरकार मनुवादी सरकार आहे, असा आरोप निदर्शकांनी केला. शेतकऱ्यांच्या साध्या मागण्या मान्य करायला तयार नाही. त्यामुळेच या सरकारचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याची भावनाही वंचितचे शहराध्यक्ष रवि शेंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.