ETV Bharat / city

नागपुरात लसीकरणाच्या मोहिमेत सावळा गोंधळ आजही सुरूच, 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद - नागपुरातील लसीकरण मोहीमेबद्दल बातमी

नागपुरात लसीकरणाच्या मोहिमेत सावळा गोंधळ आजही सुरूच आहे, आज १८ ते ४४ वर्षाच्या नागरीकांचे लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Vaccination of citizens in the age group of 18 to 44 has been stopped in Nagpur
नागपुरात लसीकरणाच्या मोहिमेत सावळा गोंधळ आजही सुरूच, 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद
author img

By

Published : May 12, 2021, 4:11 PM IST

नागपूर - राज्याची उपराजधानी नागपूर शहरात लसीकरणाच्या मोहिमेत सुरू असलेला सावळा गोंधळ आजही सुरू असल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या पत्रानुसार गेल्या दोन दिवसांपासून ठप्प पडलेले ४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे लसीकरण केवळ ३ केंद्रावर सुरू करण्यात आले आहे. मात्र, आज १८ ते ४४ वर्षाच्या नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लसींचा मुबलक साठा उपलब्ध न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेकडून सांगण्यात आली आहे.

नागपूर शहराकरता कोवॅक्सिन लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण बुधवारी फक्त तीन केंद्रावर होणार आहे. यामध्ये स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि डॉ. आंबेडकर रुग्णालय येथे कोवॅक्सिन उपलब्ध राहणार आहे, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे. 45 वर्ष वरील व्यक्तींना दूसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी फक्त तीन केंद्रांवर ऑफलाइन आणि ऑनलाइन नोंदणी पद्धतीने करण्यात येईल. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी कोणत्याही केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याने इच्छुकांच्या पदरी निराशा पडली आहे.

हेही वाचा - बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र

नागपूर जिल्ह्यासाठी 50 हजार लसींची खेप -

रात्री उशिरा नागपूर जिल्ह्याला 50 हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. या लसीमधून 25 हजार शहरी भागात तर 25 हजार लसी ग्रामीण भागातील लसीकरणासाठी वापरल्या जाणार आहेत. ज्या नागरिकांचा पहिला डोस झाला आहे, त्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी या लसीचा प्रामुख्याने वापर करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - गोव्यात ऑक्सिजन अभावी २६ कोरोना रुग्णांचा बळी; टँकर चालक नसल्याने ऑक्सिजन तुटवडा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.