नागपूर - काँग्रेस आणि इतर काही पक्ष देशात सीएए विरोधात आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर अनुराग ठाकूर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना एक आव्हान केले आहे. सोनिया आणि राहुल गांधींनी सीएए कायद्यात नागरिकता काढून घेण्याबाबतचा उल्लेख कुठे केला आहे हे दाखवावे, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. नागपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करत देशात जातीय फूट पडण्यात काँग्रेसची महत्वाची भूमिका असल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा... नूतन मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत; पाहा काय म्हणाले मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या समस्या आपण 72 वर्षांपासून सहन करत आहोत, त्यापैकी अनेक समस्या पासून मोदी सरकारने सोडवल्याचा दावा अनुराग ठाकूर यांनी केला आहे. 2019 हे वर्ष ऐतिहासिक चुका सुधारण्याचे वर्ष ठरले आहे. भूतकाळात ज्या चुका काँग्रेसने केल्या त्या मोदी सरकारने दुरुस्त केल्या आहेत, असेही ते म्हणाले. काश्मीरमध्ये कलम 370, 35 अ रद्द करण्याचा निर्णय असो, की ट्रिपल तलाकचा विषय अथवा राम मंदिर आणि सीएए, यांसारखे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय कुशलतेने निकाली काढले आहेत, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... 'पक्ष जी जबाबदारी देईल, त्याला योग्य न्याय देणार'
नागरिकता सुधारणा अधिनियम हा सुद्धा महत्वाचा विषय निकाली काढण्यात आम्हाला यश आले आहे. विरोधक या विषयावरून देशात अपप्रचार आणि हिंसा भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला आहे. CAA हा नागरिकता देण्याचा कायदा आहे. हा कायदा कुणाची नागरिकता काढून घेण्यासाठी नाही. असे बोलत अनुराग ठाकूर यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना 'CAA कायद्यात नागरिकता हिसकावण्याचा कुठे उल्लेख आहे, हे दाखवून द्यावे, असे खुले आव्हान केले.
हेही वाचा... कोण होता अमेरिकन हल्ल्यात ठार झालेला इराणचा जनरल सुलेमानी?
सोनिया गांधी आणि राहुल गांधी, ही आई मुलाची जोडी मुसलमान समाजाला घाबरवण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांनी केला. 5 वर्षात 600 मुसलमान लोकांना सरकारने भारताची नागरिकता दिलेली आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकची संख्या 23 टक्के होती आता केवळ 3 टक्के राहिली आहे. हे होत असताना काँग्रेसच्या सरकारने काय केले, याचे उत्तर राहुल आणि सोनिया गांधी यांनी द्यायला हवे, असेही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. जे भारतीय आपल्या देशात परत आले आणि येणार असतील तर यांचा विरोध करण्याचे कारण काय? सोनिया गांधी यांना सुद्धा देशाची नागरिकता मिळाली आहे, तर हे तर देशाचे नागरिक आहेत असे म्हणत अनुराग ठाकूर यांनी सोनिया गांधी वर टीका केली आहे. काँग्रेस केवळ खोट्या अफवा पसरवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा... CAA protest - जामिया विद्यापीठाबाहेर विद्यार्थ्यांचे रस्त्यांवर चित्रे काढून आंदोलन