ETV Bharat / city

पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेंतर्गत भूमिहीनांना मिळणार अर्थसहाय्य - nagpur land news

मंजुरीकरिता प्रलंबित असलेल्या ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांकडे बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जागा मिळून देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

कुंभेजकर
कुंभेजकर
author img

By

Published : Jan 22, 2021, 5:11 PM IST

Updated : Jan 22, 2021, 5:54 PM IST

नागपूर - २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसाच्या कालावधीमध्ये महाआवास अभियानाच्या माध्यमातून विविध घरकुल योजनांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे.

५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य

नागपूर जिल्ह्यात तब्बल ४१, ७३२ घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी २१, ६१८ घरकुले पूर्ण झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र मंजुरीकरिता प्रलंबित असलेल्या ग्रामीण भागातील बऱ्याच नागरिकांकडे बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जागा मिळून देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यास घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. लाभार्थी निवडीसाठी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित आहेत. ही बाब विचारात घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे.

भूमिहीन लाभार्थ्यांना मिळणार ५०० चौ. फूट जागा

पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यास ५०० चौ. फूटपर्यंत जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मोठ्या ग्रामपंचायती, शहराशेजारील ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार २ मजली (G+१)/३ मजली (G+२) इमारतीच्या भूखंडासाठी प्रती लाभार्थ्यास अर्थसहाय्य देण्यात येते.

तालुकानिहाय लाभार्थी

  • भिवापूर - १३५,
  • हिंगणा - २३८,
  • कळमेश्वर - २४ ९,
  • कामठी - ८०५,
  • काटोल - ८३३, कुही - ३१०,
  • मौदा - १०७६,
  • नागपूर ( ग्रामीण ) - ४६७,
  • नरखेड - १५५७,
  • पारशिवनी - ३५१,
  • रामटेक - १७४,
  • सावनेर - ७४६,
  • उमरेड - ४३४. याप्रमाणे एकूण ७, ३७५ असे आहेत. वरील सर्व लाभार्थी ६४० गावांमध्ये असून तेथील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून दिल्यास प्रशासनाकडून अकृषक करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल व प्रती लाभार्थी ५०, ००० रुपयाचे अनुदान देण्यात येईल. त्यानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ मिळून देण्यासाठी जिल्हास्तरावरून सक्रियपणे प्रयत्न केले जात असून अशा कुटुंबांनी जागा खरेदी करून या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Jan 22, 2021, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.