ETV Bharat / city

नितीन गडकरींच्या प्रचारासाठी आता उमा भारती नागपूरच्या मैदानात - nagpur loksabha

माझ्या आयुष्यात मला २ व्यक्तींनी सावरले आहे. त्यामध्ये पहिले नाव राजमाता सिंधिया यांचे आहे. तर, दुसरे नाव केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आहे.

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती
author img

By

Published : Apr 2, 2019, 9:50 PM IST

नागपूर - लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ आता माजी केंद्रीय मंत्री उमा भारती मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी त्यांनी ३ सभांना संबोधित केले. पहिल्या सभेत त्यांनी लोधी समाजाला एकत्रित करून गडकरी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी नितीन गडकरी हे माझे भाऊ असल्याचे म्हटले आहे.

माझ्या आयुष्यात मला २ व्यक्तींनी सावरले आहे. त्यामध्ये पहिले नाव राजमाता सिंधिया यांचे आहे. तर, दुसरे नाव केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी त्यांनी लोधी समाजातर्फे आयोजित सभेत गडकरी यांना मतदान करा, मी लोधी समाजाची मुलगी आहे, त्यामुळे त्यांना मिळणारे प्रत्येक मत माझ्या पारड्यात पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती

लोकसभा निवडणुकीत एनडीएला खंडित बहुमत मिळाल्यास गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असतील का? यावर त्या म्हणाल्या, हा वाद उपस्थित करणे मुळातच चुकीचे आहे. नरेंद्र मोदी यांना देशाने आपले पंतप्रधान म्हणून निवडले आहे. याशिवाय काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसला सत्तेत परतण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी, अशा प्रकारचा जाहीरनामा तयार करून प्रसिद्ध केला असल्याचे त्या म्हणाल्या.

Intro:नागपूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ आज माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी तीन सभांना संबोधित केले.... पहिल्या सभेत त्यांनी लोधी समाजाला एकत्रित करून नितीन गडकरी यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी त्यांनी नितीन गडकरी हे माझे भाऊ असल्याचं नमूद केलं

Body:माझ्या आयुष्यात मला दोन व्यक्तींनी सावरले आहे त्यामध्ये पहिले नाव राजमाता सिंधिया यांचे आहे तर दुसरे नाव केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे असल्याचा उल्लेख त्यांनी केला यावेळी त्यांनी लोधी समाजा तर्फे आयोजित सभेत नितीन गडकरी यांच्या घरी जा त्यांनी मते मागितली मी लोधी समाजाची मुलगी होऊन नितीन गडकरी ला मिळणारे प्रत्येक मत माझ्या पारड्यात पडणार असल्याच देखील त्या म्हणाल्या आहेत लोकसभा निवडणुकीत एनडीएला खंडित बहुमत मिळाल्यास नितीन गडकरी प्रधानमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असतील का यावर त्या म्हणाल्या की हा वाद उपस्थित करणे मुळातच चुकीचे असून नरेंद्र मोदी यांना देशाने आपले पंतप्रधान निवडले आहे याशिवाय काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसला सत्तेत परतण्याचा कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी अशा प्रकारचा जाहीरनामा तयार करून प्रसिद्ध केल्या असल्याचे ते म्हणाले आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.