ETV Bharat / city

नागपुरात 'डेड बॉडी सॅनिटायझिंग मशिन'...आता कोरोनाबाधितांचे घेता येणार अंत्यदर्शन - dead body sanitization in nagpur

कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून चार हात दूर राहणाऱ्या नातेवाईकांना संबंधित व्यक्तीचे अंत्यदर्शन देखील करता येत नाही. यावर उपाय शोधत नागपुरातील तीन प्राध्यापकांनी एक मशिन केले आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर आप्तेष्ट आणि नातेवाईकांना मृताचे अंत्यदर्शन घेणे शक्य होणार आहे.

dead body sanitizing machine
नागपुरात 'डेड बॉडी सॅनिटायझिंग मशिन'...आता कोरोनाबाधितांचे घेता येणार अंत्यदर्शन
author img

By

Published : Sep 11, 2020, 9:25 AM IST

Updated : Sep 11, 2020, 1:05 PM IST

नागपूर - कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासून चार हात दूर राहणाऱ्या नातेवाईकांना संबंधित व्यक्तीचे अंत्यदर्शन देखील करता येत नाही. यावर उपाय शोधत नागपुरातील तीन प्राध्यापकांनी एक सॅनिटायझिंग मशिन तयार केले आहे. यामुळे रुग्णाच्या मृत्यूनंतर आप्तेष्ट आणि नातेवाईकांना मृताचे अंत्यदर्शन घेणे शक्य होणार आहे. नागपूरच्या तीन संशोधकांनी विकसित केलेल्या अतिनील किरणांवर(UV) आधारित नवीन यंत्राच्या मदतीने कोरोनाबाधितांचे मृतदेह पूर्णपणे निर्जंतुक होतात. सध्या हे यंत्र प्रायोगिक तत्वावर शासकीय वैद्यकीय (मेडिकल) रुग्णालयाला देण्यात आले असून त्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हे कार्यान्वित होणार आहे.

dead body sanitizing machine
नागपुरात 'डेड बॉडी सॅनिटायझिंग मशिन'...आता कोरोनाबाधितांचे घेता येणार अंत्यदर्शन

रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत मृतदेहाची हाताळणी करणारे महापालिकेचे कर्मचारी अनेक वेळा कोरोनाबाधित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रुग्णालयातच मृतदेह ठेवलेली बॅग मृतदेहासह यंत्रात ठेऊन निर्जंतूक केली तर रुग्णालयापासून स्मशानभूमी पर्यंत मृतदेहाची हाताळणी करणारे कर्मचारी देखील संक्रमणापासून सुरक्षित राहतील, असा विश्वास डॉ. संजय ढोबळे यांनी व्यक्त केला आहे.

रुग्णाच्या मृत्यूनंतर आप्तेष्ट आणि नातेवाईकांना मृताचे अंत्यदर्शन घेणे शक्य होणार आहे.

कोरोनामुळे रुग्ण दगावल्यानंतर त्याच्या आप्तेष्टांचे चार हात देखील त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित मृत व्यक्तीचे अंत्यंसंस्कार महापालिका किंवा नगरपालिकेचे कर्मचारीच करतात. मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये पॅक केलेले असल्याने कुटुंबियांना मृताचा चेहरा पाहणे ही शक्य होत नाही. म्हणूनच नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक संजय ढोबळे, सेवादल महिला महाविद्यालयाच्या डॉ.निरुपमा ढोबळे आणि दादासाहेब बालपांडे फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक निलेश महाजन या तिघांनी अभिनव यंत्र साकारले आहे.

अंत्यविधीच्या प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांना किमान मृतदेहाच्या जवळ जाऊनअंतिम दर्शन घेता येईल, अशी सुविधा करण्यात आली आहे. "डेड बॉडी युव्ही सॅनिटायझिंग युनिट" असे या यंत्राचे नाव असून या यंत्रात अल्ट्रा व्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणांचा वापर करण्यात आला आहे. मृतदेह ठेवलेले प्लास्टिकचे बॅग मृतदेहासह या यंत्रातील स्ट्रेचरवर ठेवल्यास अतिनील किरणांच्या ५ मिनिटांच्या माऱ्यामुळे मृतदेह आणि त्याचे प्लास्टिकचे बॅग पूर्णपणे निर्जंतुकीकरण होते, असा संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे मृतदेहापासून संक्रमाणाचा धोका टळतो आणि मृत व्यक्तीचे नातेवाईक, मित्र परिवार ठराविक अंतर ठेऊन त्यांचे अंतिम दर्शन करू शकतात. सध्या हे यंत्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला प्रायोगिक तत्वावर देण्यात आले आहे.

Last Updated : Sep 11, 2020, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.