नागपूर - शहर काँग्रेसमधील गटबाजी जगजाहीर आहे. मात्र, महानगरपालिकेत तोफफोड करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विरोधी पक्षनेते तानाजी वणवे यांचा कार्यालयात जाऊन मध्य नागपूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. कार्यकर्त्यांच्या गळ्यात हार घालून स्वयंघोषित विरोधी पक्षाचे नारे देत खुर्ची बळकवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.
हेही वाचा - नागपुरात 'आरएसएस'च्या विशेष तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात
तानाजी वणवे हे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, आंदोलनं, मोर्चा यामध्ये त्यांचा सहभाग नसतो, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे आणि विरोधी पक्षनेते विकास ठाकरे हे एका पक्षात असून फोन वेगळ्या गटात आहेत. त्यामुळे विकास ठाकरेंच्या गटातील मध्य नागपूरचे नगरसेवक बंटी शेळकेंच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. या घटनेची तक्रार हायकमांडकडे करणार, अशी माहिती विरोधी पक्षनेते तानाजी वणवे यांनी दिली.