ETV Bharat / city

नागपुरात संघ परिवाराची दोन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वात संघ परिवारात काम करणाऱ्या सर्व 36 संघटनांची समन्वय बैठक वार्षिक पातळीवर पार पडत असते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी होणारी ही बैठक यावेळी नागपुरात होत आहे.

राष्ट्रीय स्वराष्ट्रीय स्वयंसेवक संघ बैठकयंसेवक संघ मुख्यालय
राष्ट्रीय स्वयंसेवराष्ट्रीय स्वयंसेवक संघ बैठकक संघ मुख्यालय
author img

By

Published : Sep 1, 2021, 9:20 PM IST

नागपूर - रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात अखिल भारतीय समन्वय बैठक होणार आहे. ही बैठक 3 आणि 4 सप्टेंबरला असणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये संघ परिवारातील सर्व 36 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.

काय आहे समन्वय बैठक?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वात संघ परिवारात काम करणाऱ्या सर्व 36 संघटनांची समन्वय बैठक वार्षिक पातळीवर पार पडत असते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी होणारी ही बैठक यावेळी नागपुरात होत आहे. यामुळे या बैठकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या नेतृत्वात होणार आहे. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस, संघ आणि भाजपामध्ये समन्वयाचे काम पाहणारे बी एल संतोष हे सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. यावर्षी होणाऱ्या बैठकीत संघ परिवारातील विविध संघटनांनी वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच पुढील कामांचा रोडमॅप काय असणार याची माहितीही घेतली जाते. या समन्वय बैठकीत संघाच्या विविध संघटनांमध्ये समन्वयासाठी आवश्यक मुद्यांवरही चर्चा केली जाते. आपापसात समन्वय वाढवण्यासाठी काय करता येईल याचे नियोजन या बैठकीत केले जाते. विशेष म्हणजे संघाच्या रचनेत असलेल्या विविध प्रांतांमधील समन्वय बैठका पूर्ण झाल्यानंतर अखिल भारतीय समन्वय बैठक दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पार पडत असते.

हेही वाचा - नवरदेवाची तीन किलोमीटर चिखलातून पायपीट, ईटीव्ही भारत'वर पहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.