ETV Bharat / city

नागपूरात बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

author img

By

Published : Jun 1, 2021, 8:18 AM IST

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका किरायाच्या खोलीत बनावट नोटा छापण्याचे काम करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

नागपूरात बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोन आरोपींना अटक

नागपूर - नागपूर गुन्हे शाखेच्या परिमंडळ दोनच्या पथकाने बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. निलेश राजू कडवे आणि मारुफ खान रफिक खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोपींनी बनावट नोटा छापण्याचा आणि चलनात आणण्याचा गैरप्रकार सुरू केला होता, असा खुलासा झाला आहे.

बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोन आरोपींना अटक

संगणक, प्रिंटरसह १००, ५०, २०, आणि १० च्या बनावट नोटा केल्या जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपींनी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खोली भाड्याने घेतली होती. त्या ठिकाणी दोन्ही आरोपी नोटा छापण्याचे काम करायचे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना या संदर्भात माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी मानकापूर येथील एकात्मता नगर परिसरातील आरोपींच्या खोलीवर धाड घातली. पोलिसांनी त्या खोलीतून बनावट नोटा छापण्यासाठी उपयोगात येत असलेले संगणक, प्रिंटरसह १००, ५०, २०, आणि १० च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

बनावट नोटा
बनावट नोटा

इंटरनेटच्या मदतीने बनावट नोटा तयार कारायचे

गुन्हे शाखा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली, तेव्हा आरोपींनी धक्कादायक खुलासा केला आहे. इंटरनेटच्या मदतीने युट्युब वर पाहून ते बनावट नोटा बनवण्याचे शिकले होते. यासाठी त्यांनी २ महिने सराव देखील केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

हेही वाचा - माता तू वैरिणी! स्वतःच्या बाळाला अमानुष मारहाण करणाऱ्या आईवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.