नागपूर - गोवारी समाज हा आदिवासीमध्ये मोडत नाही असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता आदिवासी समाजाकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. आदिवासी समाजाचे दैवत समजल्या जाणाऱ्या वक्त बुलंदशहा यांच्या पुतळ्यासमोर आदिवासी समाजाकडून जल्लोष करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून गोवारी समाज आदिवासी असल्याचा दावा केला जात असल्याने हा वाद न्यायालयात सुरू होता, त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निवाडा केला आहे. ज्यानुसार गोवारी हा आदिवासी नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सोबतच आदिवासीमध्ये दुसऱ्या जमातीला समाविष्ठ करण्याचा अधिकार कुठल्याही राज्य सरकारला नाही तर तो फक्त लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतींना आहे, असंही निकालात न्यायालयाने स्पष्ठ केलं आहे. या निर्णयामुळे बोगस आदिवासींचं समर्थन करणारे राजकाऱ्यांना चपराक बसली आहे असं सांगत आदिवासी समाजाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाला न्याय मिळावा
गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने अनेकांनी यावर राजकारण केलं,त्यात बोगस बोगस आदिवासींना पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र न्यायालयाने या संदर्भात महत्वपूर्ण निकाल दिल्याने हा विषय आता पूर्णपणे संपलेला असल्याची भावना आदिवासी समाजातील तरुणांनी व्यक्त केली आहे.