नागपूर - नागपूर शहरात गांजा, ड्रग्स, चरस, ब्राऊन शुगरच्या वाढत्या घटनांमुळे ( Increasing incidents of drugs, charas, brown sugar in Nagpur city ) पोलिसांची चिंता वाढली आहे. वर्षी अमली पदार्थ विरोधी पथकाने ( Anti Narcotics Squad ) एकूण ११३ गुन्ह्यांची नोंद केली आहे. तर, तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांचे ( 1 crore 15 lakh seized drugs ) अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. शहरात अमली पदार्थ तस्करी, विक्री करणारे आरोपी आपले जाळे तयार करत असल्याने त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पोलिसांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत.
१३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण - युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता, गुन्हेगारी, ( Increasing addiction, crime among youth ) अंमली पदार्थाची समस्या ( Drug problem in Nagpur ) ही नागपूरात दिवसें-दिवस मोठयाप्रमाणात वाढत आहे. वाढती व्यसनाधीनता ही सर्वात मोठी समस्या मानून त्यावर उपाय म्हणून पोलीस काका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ही संकल्पना पुढे आली आहे. पोलीस काकांच्या मदतीने ( Police Uncle Training ) नागपूर शहरातील विविध शाळा, कॉलेज, स्लमवस्तीत जावून जनतेमध्ये अंमली पदार्थाचे दुष्परीणाम सांगितले जाणार ( Adverse drug effects ) आहे. सुरवातीला शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत १३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
पोलीस काका मोहीम - नागपूर शहरातील दाट लोकवस्त्या,अपुऱ्या पायाभुत सुविधा, पर्यावरण,झोपडपटया, गुन्हेगारी,दारीद्रय या समस्यांचा सामना नागपुरात निर्माण झाल्या आहेत. यामध्ये ड्रग्स, अमली पदार्थांचा वाढता वापर समाजासाठी फारच घातक ठरत असल्याने नागपूर पालिसांनी शहराला ड्रग्स मुक्त करण्यासाठीचं पोलीस काका ही मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबईचे व्यसनमुक्ती सल्लागार बॉस्को डिसुजा हे मार्गदर्शन करत आहेत.
सात महिन्यात ३९५ किलो गांजा जप्त - नागपूर गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी सात महिन्यात एकूण ११३ गुन्ह्यांची नोंद केली. तर, एकूण १७२ आरोपींच्या मुसक्या अवळण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ६१ प्रकरणे हे गांजा तस्करीचे असून ३९५ किलो ५२७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ५९ लाख १७ हजार ६१३ रुपये इतकी आहे. गांजा तस्करीमध्ये एकूण ८४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ब्राऊन शुगर/चरस तस्करीच्या घटना - याशिवाय ब्राऊन शुगरच्या दोन केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १६ ग्रॅम ७४० मिलिग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. त्याचा बाजारभाव ५७ हजार ३०० रुपये इतका आहे. या दोन प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने यावर्षी चरस तस्करीचे प्रकारण सुद्धा उजेडात आणले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला १० ग्रॅम चरससह अटक केली होती.
हेही वाचा - Rape In Nagpur : गुंगीचे औषध देऊन बलात्कार; तोतया लष्करी अधिकाऱ्याचे पितळ उघडे
एमडी ड्रग्स विरोधी मोहीम जोरात - सध्या सर्वाधिक मागणी असलेले एमडी ( मेफेड्रोन ड्रग्स ) तस्करीच्या १८ प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत ५५ लाख ५९ हजार ६०० रुपये किमतीचे ५७३ ग्रॅम २६६ मिलीग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केलेलं आहे. या १८ प्रकरणी पोलिसांनी एकूण ३६ आरोपींना अटक केली आहे. या व्यतिरिक्त काही अन्य प्रकारणांमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.
विकासासोबत समस्यांनी जन्म घेतला - नागपुर शहराचे जसे-जसे महत्व वाढत आहे. तस-तसा त्याचा विकास होत आहे. व्यापही वाढत आहेचं. दररोज नव्या संधी नागपुरात उपलब्ध होत आहेत. युवकासाठी तर, ही पर्वणीच आहे. केवळ शिक्षण रोजगारच नव्हे तर, कलाक्षेत्र,उद्योग, सेवा,स्वंयरोजगार, स्टार्टअप्स करिता देखील नागपुरात अपरिमीत संधी उपलब्ध होत आहेत. शहराच्या वाढत्या व्यापाबरोबरच काही समस्यांदेखील जन्म घेत आहेत.
हेही वाचा - Nanded crime : नांदेडात रिंदाच्या नावाने खंडणी मागणार्याला पोलिसांनी घेतले ताब्यात