ETV Bharat / city

Collerwali Tigress Death : कॉलरवाली वाघिणीचा इतिहास असाच अजरामर व्हावा, व्याघ्रप्रेमींची इच्छा - कॉलरवाली वाघीण वरुण ठक्कर फोटो

नागपुरातले वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वरूण ठक्कर यांनी या वाघिणीचा आणि 29 शावकांचा कॅमरेमध्ये कैद ( Collerwali Tigress Photo ) केलेला ठेवा मृत्यूनंतर ( Collerwali Tigress Death ) इतिहास झाला आहे. याच कॉलरवाली वाघीणीचा इतिहास पुढेही जिवंत रहावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

Collerwali Tigress Photo
Collerwali Tigress Photo
author img

By

Published : Jan 18, 2022, 7:08 PM IST

Updated : Jan 18, 2022, 10:44 PM IST

नागपूर - मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला समृद्ध करणाऱ्या कॉलरवाली ( Collerwali Tigress Death ) म्हणजेच सुपरमॉम वाघिणीचा वृद्धपकाळाने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर व्याघ्र प्रेमी शोकाकुल झाले. आता फक्त तिच्या आठवणी शिल्लक राहिलल्या आहेत. नागपुरातले वाईल्ड लाईफ फोटोग्राफर वरूण ठक्कर यांनी या वाघिणीचा आणि 29 शावकांचा कॅमरेमध्ये कैद ( Collerwali Tigress Photo ) केलेला ठेवा मृत्यूनंतर इतिहास झाला आहे. याच कॉलरवाली वाघीणीचा इतिहास पुढेही जिवंत रहावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

16 वर्षात तब्बल 29 शावकांना दिला जन्म -

कॉलरवली वाघिणीने एक असा इतिहास रचला आहे. मध्यप्रदेशला 'टायगर स्टेटचा' दर्जा मिळून देण्यात या सुपरमॉमचे मोठे योगदान राहिले आहे. व्याघ्र संवर्धनात तिचे योगदान कायम लक्षात राहिल असेच आहे. 2005 मध्ये जन्माला आलेली कॉलरवाल्या वाघीणीने सर्वात पहिले ऑक्टोबर 2008 तीन शावकांना जन्म दिला. पण हे शावक जास्त दिवस जगू शकले नाही. 2008 ते 2019 या 16 वर्षात आठ वेळा तिने तब्बल 29 शावकांना जन्म दिला. जवळपास 25 शावक आज जिवंत असून या तिच्या कुटुंबातील शावकांना कॅमेरात कैद करण्यासाठी वाइल्डलाइफ फोटोग्राफर म्हणून वरुण ठक्कर यांनी खूप मेहनत घेतली.

हजारो सफारीमध्ये कॅमराबद्द केले छायाचित्र -

ठक्कर यांनी एक हजार पेक्षा जास्त वेळा जंगल सफारी केली. देशभरातील विविध जंगलात फिरत असताना सर्वाधिक सफारी त्यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पात केल्याचेही ते सांगतात. वन्य प्राण्यांची फोटो काढण्याची आवड असताना कधीतरी पेंचची राणी असलेल्या कॉलरवाली वाघिणीचे आणि तिच्या शावकांचे फोटो फोटो गोळा झाले. त्यानंतर 8 वेळा प्रसूतीनंतर प्रत्येकवेळी नवीन शावक आणि त्याचा मागोवा घेत त्यांना कॅमेराने टिपण्यासाठी प्रयत्न केलेत. पण अनेकदा एकही फोटो टिपू शकले नाही, असेही प्रसंग आले. शेकडो किलोमीटरवरून रिकाम्या हाताने सुद्धा परत यावे लागल्याचे वरूण ठक्कर म्हणालेत.

16 वर्षात 29 शावकांना जन्म घालणे हा विक्रमच -

वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने तिच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी वन विभागाचे 2009 ते 10च्या दरम्यान रेडिओ कॉलर लावण्यात आला. त्यानंतर मात्र कॉलरवाली अशीच ओळख कायम झाली. पर्यटकांनी तिला तेव्हापासून कॉलरवाली वाघीण अशी ओळख दिली. कॉलरवाली वाघीनीचे जरी 25 शावक जिवंत असले, तरी 29 शावक दिले. यामध्ये एकाच वाघीणीने इतक्या मोठ्या संख्यने शावक जन्माला घालणे हा एक विक्रम असल्याचे वरूण ठक्कर सांगतात. यासोबतच तिची एक मादा शावक टी-4 म्हणजेच पाटदेव वाघीण हिने सुद्धा एकाचवेळी पाच शावक दिले आहे. हीच वाघीण कॉलरवाली वाघिणीच्या नंतर तिच स्थान घेऊन पुढे जंगलात वर्चस्व सिद्ध करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शावकांना जन्म घालतांना पेंचमधील रय्याकस्सा मेल टायगर आणि बीएमडब्ल्यु (BMW) मेल टायगर यांच्या संपर्कात आली होती.

तिला सुपरमॉम का म्हणतात -

कॉलरवाली वाघिणीने एकाचवेळी 2010मध्ये पाच शावकांना जन्म दिला होता. जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळात ती शावकांना शिकार करणे हे शिकवत असते. त्यानंतर ती स्वतःला वेगळी करते. पण जेव्हा सोबत असतात. या सर्वशावकांना मोठे होत असताना प्रत्येकी 30 ते 40 किलो मांस लागायचे. यासाठी तिला दिवसातून किमान तीनवेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा शिकार करून शावकांचे पोट भरावे लागत होते. या सर्व शावकांना कालांतराने वेगळे केले. हेच पाच शावक नाही, तर जवळपास सर्वच ज्यामध्ये 25 शावक हे जिवंत असणे हे सुद्धा एका सुपरमॉम म्हणून तिला वेगळी ओळख निर्माण करून देणारी आहे. कॉलरवाल्या वाघीणीने मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत विस्तारलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाला खऱ्या अर्थाने ओळख दिली. कॉलरवाल्या वाघीणीने वाइल्डलाइफ फोटोग्राफर म्हणून मला सुद्धा एक वेगळी ओळख मिळवून दिल्याचे वरूण ठक्कर सांगतात. त्यामुळे दीड दशकाच्या कालावधीत तिचे कॅमेरामधून टिपलेले वेगवेगळे छायाचित्र हे वनविभागाला देण्यासाठी तयार आहे. या छायाचित्रांचे जे वेगळे कलेक्शन आहे. त्याला फ्लेक्स आणि बॅनरच्या माध्यमातून पेंच व्याघ्र प्रकल्पात लावून कॉलरवाल्या वाघिणीचा इतिहास अजरामर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - BJYM Against Nana Patole : नाना पटोलेंची जीभ कापणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देणार : भाजपा युवा मोर्चाची घोषणा

Last Updated : Jan 18, 2022, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.