ETV Bharat / city

नागपूर कारागृहात दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन कैदी जखमी

कारागृह प्रशासनाने धंतोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोन्ही टोळींवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या महिन्यातसुद्धा दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली होती.

नागपूर कारागृह
नागपूर कारागृह
author img

By

Published : Jul 15, 2021, 6:02 PM IST

नागपूर - नागपूर मध्यवर्ती कारागृहात पुन्हा कैद्यांमध्ये टोळी युद्धातून जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन कैदी जखमी झाले आहेत. कारागृह प्रशासनाने धंतोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोन्ही टोळींवर गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या महिन्यातसुद्धा दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने कारागृहाच्या आतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे.

दोन्ही टोळीवर गुन्हा

नागपूर मध्यवर्ती कारागृह नेहमीच वादात भोवऱ्यात अडकलेले असते. यापूर्वी अनेकवेळा कैद्यांकडे मोबाइलसह अमली पदार्थ सापडल्याचा घटना घडल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कारागृहात कैद्यांमध्ये टोळीयुद्ध पेटल्याच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद अमीर पटेल हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. त्याच्यावर प्रतिस्पर्धी शेख रिझवान शेख मुझिब, प्रज्ज्वल शेंडे, संतोष गोंडसह काही इतर कैद्यांनी संगनमत करून हल्ला केला. या संदर्भात अमीरचे सहकारी सौरभ तायवाडे आणि मोनू समुद्रे यांना माहिती कळताच त्यांनी शेख रिझवानवर लोखंडी पट्टीने हल्ला केला. या संघर्षात तीन कैदी जखमी झाले आहेत. कारागृह प्रशासनाने धंतोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे कैद्यांचा दोन्ही टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.

कारागृहात हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ

२० जून रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात झालेल्या हाणामारीत एक कैदी गंभीर जखमी झाला होता, तर झटापट सोडवायला गेलेले दोन जण किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली होती. राजू वर्मा असे जखमी कैद्याचे तर विवेक पालटकर असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. विवेक पालटकर हा पाच जणांच्या हत्येच्या आरोपात कारागृहात न्यायबंदी आहे. राजूसोबत झालेल्या वादातून विवेकने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. २४ एप्रिल रोजीसुद्धा कारागृहात हाणामारीची घटना घडली होती. वर्चस्वाच्या वादातून तीन कैद्यांच्या एक गटाने प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केली. हल्ला झालेल्या कैद्याचे नाव रोशन कयूम शेख असे असून तो मकोका कायद्यानुसार कारागृहात गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहे. या घटनेत जखमी झालेल्या रोशनला उपचारासाठी दाखल करावे लागते होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.