ETV Bharat / city

Har Ghar Tiranga १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन्ही दिवशी ध्वजारोहणाचे नियम आहेत वेगळे

आपला राष्ट्रध्वज तिरंगा म्हणजे देशाचा अभिमान अस्मिता आणि सन्मान आहे. तिरंगा ध्वज दिसताचं उर कसा अभिमानाने भरून येतो. आणि त्यातल्या त्यात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी तर राष्ट्रप्रेमाची भावना तिरंगा ध्वजामुळे आणखी द्विगुणित होते. मात्र आपल्या तिरंगा ध्वजारोहणा मागे देखील एक रोचक तथ्य लपलेले आहे. या बाबत मात्र अनेकांना कल्पना नसेल. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण हे दोन वेगळ्या पद्धतीने करण्याचा नियम आहे. हा नियम काय सांगते हे आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

राष्ट्रध्वज तिरंगा
Har Ghar Tiranga
author img

By

Published : Aug 12, 2022, 12:52 PM IST

नागपूर आपला राष्ट्रध्वज तिरंगा (Har Ghar Tiranga) म्हणजे देशाचा अभिमान,अस्मिता आणि सन्मान आहे. तिरंगा ध्वज दिसताचं उर कसा अभिमानाने भरून येतो. आणि त्यातल्या त्यात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी (Indian Independence Day) तर राष्ट्रप्रेमाची भावना तिरंगा ध्वजामुळे आणखी द्विगुणित होते. मात्र, आपल्या तिरंगा ध्वजारोहणा मागे देखील एक रोचक तथ्य लपलेले आहे; या बाबत मात्र अनेकांना कल्पना नसेल. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण (the flag on 15th August and 26th January) हे दोन वेगळ्या पद्धतीने (different rules for hoisting the flag) करण्याचा नियम आहे. हा नियम काय सांगते, हे आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत.

आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा हा तीन रंगानी मिळून तयार झाला आहे. ज्यामध्ये सर्वात वर भगवा मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आहे. ध्वजाच्या अगदी मध्ये निळ्या रंगाचा रंगाचे अशोक चक्र आहे. २२ जुलै १९४७ रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत तिरंगा झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आला. हा राष्ट्र ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केला आहे.

प्रतिक्रीया व्यक्त करतांना निवृत्त कर्नल अभय पटवर्धन

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ध्वजारोहणातील फरक स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्टला तिरंगा झेंडा हा दोरीच्या मदतीने खालून वर ओढला जातो, त्यानंतर ध्वजारोहण केले जाते. मात्र, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज खालून वर ओढला जात नाही; तर तो वरच्या बाजूला बांधला जातो, मान्यवरांच्या हस्ते दोरीला एक झटका दिला जातो तेव्हा ध्वजारोहण होते.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला कोणाला आहे ध्वजारोहणाचा मान १५ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान जे की केंद्र सरकारचे प्रमुख असतात ते ध्वजारोहण करतात. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या देशाचे संविधान लागू झाले नव्हते, म्हणुन हा मान पंतप्रधानांना आहे. तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी देशाचे संविधान लागू झाले होते, म्हणून संविधानिक प्रमुख या नात्याने २६ जानेवारीला राष्ट्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.

कोण कुठे करतात ध्वजारोहण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला होणाऱ्या ध्वजारोहणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. तर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती राजपथावर ध्वजारोहण करत असतात.

हेही वाचा Virar Flag Making विरारमधील ४५० महिलांचे हात गुंतले ध्वजनिर्मितीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.