ETV Bharat / city

नागपुरात जुन्या वादातून तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद - विक्की गोडघाटे

भंगार व्यावसायिकाने त्याचा मुलगा व जावयाच्या मदतीने 32 वर्षीय तरुणास जबर मारहाण केली. याप्रकरणी पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलीस या तक्रारीची गंभीर दखल घेत नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

जुन्या वादातून तरुणाला मारहाण
author img

By

Published : Sep 3, 2019, 6:09 PM IST

नागपूर - जुन्या वादातून एका भंगार व्यावसायिकाने मुलगा व जावयाच्या मदतीने 32 वर्षीय तरुणास जबर मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस वाचवत असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.

जुन्या वादातून तरुणाला मारहाण

नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकेनगर परिसरात विक्की गोडघाटे या तरुणाचा फोटो स्टुडिओ आहे. फोटो स्टुडिओच्या शेजारी पाटील नावाच्या व्यक्तीचे भंगाराचे दुकान आहे. विक्की व पाटील यांच्यात जुना वाद होता. विक्की हा दुचाकीवरून दुकानातून बाहेर पडला. दरम्यान, त्याच रस्तावर अमोल पाटील समोर आला. कार आडवी लावून आरोपीने विक्कीचा रस्ता रोखला. त्यावेळी दोघामध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. वादामुळे आरोपी अमोल पाटील कारमधून बाहेर आला व विक्कीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी अमोलचे वडील रतन पाटील देखील आले. त्यांनीही लाकडी दांड्याने विक्कीला मारहाण केली. मारहाणीचा वेळी रतन पाटील यांच्या मुलीने देखील मारहाण केली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. मारहाणीच्या या प्रकारानंतर विक्की अजनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यास गेला. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप विक्की गोडघाटे याने केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावरही स्थानिक पोलिसांनी केवळ थातूर मातूर कारवाई केल्याचा आरोपही पीडित तरुणाने केला आहे.

Intro:जुन्या वादातून एका भंगार व्यावसायिकाने मुलगा व जावयाच्या मदतीने 32 वर्षीय तरुणास जबर मारहाण केल्याची घटना नागपूरात घडली आहे.... या मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला आहे... मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस वाचवत असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
Body:नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेके नगर परिसरात विक्की गोडघाटे या तरुणाचे फोटो स्टुडिओ आहे... फोटो स्टुडिओच्या शेजारी पाटील नावाच्या व्यक्तीचे भंगाराचे दुकान आहे... विक्की व पाटील यांच्यात जुना वाद होता... विक्की हा दुचाकीवरून दुकानातून बाहेर जात असताना त्याच रस्तावर अमोर-समोर आलेल्या अमोल पाटील नावाच्या आरोपीने कार ने विक्की चा रस्ता अडवला... त्यावेळी दोघांतही शाब्दिक वाद झाला... याचा वादात आरोपी अमोल पाटील कार मधून बाहेर आला व विक्कीला मारहाण करण्यास सुरुवात केली... हे पाहून अमोलचे वडील रतन पाटील देखील आले व लाकडी दांड्याने विक्कीला मारहाण केली... मारहाणीचा वेळी रतन पाटील यांच्या मुलीने देखील मारहाण केली... ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे... मारहाणीचा या प्रकाराबद्दल अजनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप पीडित विक्की गोडघाटे ने केला आहे... वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावरही स्थानिक पोलिसांनी केवळ थातूर मातूर कारवाई केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.