नागपूर - राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ कायम असताना, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा देणारी एक बातमी आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्या विरुद्धची एक फौजदारी याचिका फेटाळून लावली आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करणारी रिट याचिका अॅड. सतीश उके यांनी दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा... धक्कादायक .. 'केईएम'मध्ये आग; उपाचारासाठी दाखल 'प्रिन्स'चा कापावा लागला हात, गुन्हा दाखल
राज्यात सत्ता स्थापन न करू शकल्यामुळे चिंतेत असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातून चांगली बातमी मिळाली आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप करणारी रिट याचिका अॅड सतीश उके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. याचिकाकर्ते सतिश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे, असे या याचिकेत नमूद केले होते. न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून सतीश उके यांची याचिका फेटाळली आहे.
हेही वाचा... सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी