ETV Bharat / city

'सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी' - Devendra Fadnavis financial package demand

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शासनाने जनतेसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis financial package demand
देवेंद्र फडणवीस आर्थिक पॅकेज मागणी
author img

By

Published : Apr 4, 2021, 7:45 PM IST

Updated : Apr 5, 2021, 7:11 AM IST

नागपूर - राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यानी केले आहे. नागपूरमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. जवळपास 57 हजार अ‌ॅक्टिव्ह रूग्ण आहे. मृतांचा आकडा वाढत असल्याने लसीकरण मोहीम अधिक गतीने राबवण्याची गरज आहे. राज्यसरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेतले आहेत. यात वीकएन्ड लॉकडाऊन आणि काही पर्शियल लॉकडाऊन जाहीर केला आहे. भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेने अशा परिस्थितीमध्ये सहकार्य करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. मात्र, केवळ लॉकडाऊन करून चालणार नाही तर महाराष्ट्रातच कोरोना का वाढतो आहे? यावर विवेचन झाले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर जिल्ह्यांतील आरोग्य व्यवस्था सक्षम करा -

मुंबई-पुणे ही महत्त्वाची शहरे आहेत. त्याठिकाणी विशेष लक्ष दिलेच पाहिजे. पण या दोन शहराच्या बाहेरही महाराष्ट्र आहे. या इतर शहरांची आरोग्य व्यवस्था देखील राज्य सरकारच्याच हातात आहे. या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांना सक्षम केले पाहिजे. राज्यभरात अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर होत आहे.

नवीन स्ट्रेन वेगाने पसरत आहेत -

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये काही लोकांशी चर्चा केल्यानंतर समजले की, यामुळे लंग्ज इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रूग्ण झपाट्याने बाधित होत आहेत. त्यामुळे तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे, असेही विरोधी पक्ष नेते फडणवीस म्हणाले.

सरकारने वीजबिल वसुली थांबवावी -

राज्य सरकारने वीज बिलात सक्तीची करवाई करून कोरोनाच्या परिस्थितीत 4 ते 5 कोटी रूपये जमा केले. या तुघलकी कारवाईमुळे समान्य नागरिक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत नागरिक सहकार्य करणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनसारख्या संकटांचा सामना करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांसाठी शासनाने पॅकेज जाहीर केले पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार

Last Updated : Apr 5, 2021, 7:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.