ETV Bharat / city

पुढील तीन दिवसानंतर होणार थंडीचे पुनरागमन; हवामान विभागाची बातमी

यावर्षी संपूर्ण विदर्भात अजूनही हवी तशी थंडी पडलेली नाही. आता तर तापमान सामान्य पेक्षा ८ अंश सेल्सिअस अधिक झाल्याने विदर्भात दिवसाच्या वेळी उकाडा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभाग
हवामान विभाग
author img

By

Published : Jan 8, 2021, 5:27 PM IST

नागपूर - यावर्षी संपूर्ण विदर्भात अजूनही हवी तशी थंडी पडलेली नाही. आता तर तापमान सामान्य पेक्षा ८ अंश सेल्सिअस अधिक झाल्याने विदर्भात दिवसाच्या वेळी उकाडा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण असल्याने आज अकोला आणि नागपूरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे थंडी कमी झाली असली तरी पुढील तीन दिवसात थंडीचे पुनरागमन होणार, असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी एम एल साहू यांनी दिली आहे.

एम एल साहू

मध्य भारत, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये अँटी सायक्लोनिक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे थंड हवा येणे थांबले. त्यामुळे दक्षिणेकडील वारा बंगालच्या खाडीकडून मॉसचर घेऊन येत आहे. यामुळे संपुर्ण विदर्भ आणि शेजारच्या राज्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज सकाळी काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. अशीच परिस्थिती पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याने पावसाची शक्यता असल्याची माहिती एम एल साहू यांनी दिली आहे.

तीन दिवसानंतर थंडीचे पुनरागमन होणार-

ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांचे तापमान वाढले आहे. मात्र पुढील तीन दिवसात निर्माण झालेली अँटी सायक्लोनिक परिस्थितीमध्ये बदल होणार आहे, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा थंडीचे पुनरागमन होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

विदर्भातील जिल्ह्यांचे तापमान-

आज उपराजधानी नागपूरात २१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून सामान्यतः पेक्षा ८.४ अंश सेल्सिअसने अधिक आहे. तर अकोला शहरात आज २०.३ डिग्री तापमान नोंदवण्यात आले आहे. अकोल्यात सुद्धा ६.४ डिग्री अधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे अमरावती येथे १८.२ अंश सेल्सिअस तापमानाची आज नोंद झाली असून सामन्यात पेक्षा ३.९ अंश सेल्सिअस अधिक आहे. बुलढाणा जिल्यात देखील उकाडा वाढला असून आज त्याठिकाणी २०.६ डिग्री तापमान नोंदवण्यात आले आहे. या ठिकाणी देखील ६.२ अधिक तापमानाची नोंद झाली आहे. सर्वात गरम जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात आज २१ डिग्री तापमानाची नोंद झाली असून सामान्य पेक्षा ७ डिग्रीने अधिक आहे. वर्धा मध्ये आज २१.४ इतके तापमान असून हे देखील ८.६ ने जास्त आहे. हीच परिस्थिती गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात बघायला मिळत आहे

हेही वाचा- २६/११चा मास्टरमाईंड लख्वीला १५ वर्षांची शिक्षा; पाकिस्तानी न्यायालयाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.