ETV Bharat / city

कड्याक्याच्या थंडीमुळे विदर्भ गारठला; पुढील चार दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता - nagpur climate news

नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढलेला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भात शीत लहर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

हवामान
हवामान
author img

By

Published : Dec 23, 2020, 6:29 PM IST

नागपूर - नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढलेला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भात शीत लहर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आता थंड हवेची दिशा बदलल्याने काही प्रमाणात थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर थंडी पुन्हा वाढणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा चार ते पाच अंश सेल्सिअस ने खाली आला होता. त्यामुळे रात्री रस्त्यांवर अघोषित संचारबंदी असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे.

एम. एल. शाहू - हवामान विभाग

नागपूरसह विदर्भ गारठला -

आज नागपुरातील तापमान ९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशीच परिस्थिती संपूर्ण विदर्भात बघायला मिळत आहे. मधल्या काळात ढगाळ वातावरणामुळे थंडी चा प्रभाव कमी झाला होता,त्यानंतर उत्तरे कडे हीमवृष्टी व्हाययला सुरवात झाली होती,त्यामुळे संपूर्ण मध्य भारतात थंडीचा जोर वाढला होता.मात्र आता पुन्हा एकदा हवेने आपली दिशा बादल्यामुळे थंडीचा प्रभाव काही प्रमाणात कमी होईल ज्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी एम एल शाहू यांनी दिली आहे.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी तापमानात होते घट

गेल्या काही वर्षांपासून डिसेंबर महिन्याच्या शेवटी तापमानात प्रचंड घट नोंदवण्यात येत आहे. २०१८ साली २९ डिसेंम्बरच्या रात्री तापमान ३.५ पर्यंत खाली आले होते. तर गेल्या वर्षी देखील थंडीचा पारा ५.१ पर्यंत खाली आल्याची नोंद हवनामान विभागाकडे आहे. त्यामुळे यावर्षी जुने रेकॉर्ड मोडीत निघतील का याकडे सर्व नागपूरकरांचे लक्ष लागलेलं आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.