नागपूर - एकीकडे मान्सूनसाठी ( Monsoon in India ) भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे नागपूरसह विदर्भ आणि मध्यभारतात 'नवतपा'ला ( Navatpa started in Nagpur Vidarbha and Central India ) सुरुवात झाली आहे. नवतपा म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उष्ण नऊ दिवस, या नऊ दिवसांमध्ये तापमान मोजणाऱ्या यंत्रावर पारा जरी कमी दाखवत असला तरी उत्तरेकडील अनेक राज्यांमधून वाहणाऱ्या अतिउष्ण वाऱ्यांमुळे वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण होतो. आज नवतपाचा तिसरा दिवस आहे. राज्यात आज तापमानाचा पारा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
नवतपा म्हणजे नेमके काय ? : दरवर्षी 24 ते 25 मे दरम्यान नवतपाला सुरुवात होते. नवतपाच्या काळात पृथ्वीवर उष्णता प्रचंड वाढते. हिंदू ज्येष्ठ महिन्यात नवतपा येतो. सूर्य ज्यावेळी 15 दिवसांकरिता रोहिणी नक्षत्रात येतो, त्यातील सुरुवातीच्या नऊ दिवसाला नवतपा, असे म्हटले जाते.
नवतपा संदर्भात 'या' आहेत मान्यता : पावसाळ्याची दशा आणि दिशा कशी राहील हे ठरवण्यासाठी नवतपाच्या नऊ दिवसांना फार महत्त्व आहे. या नऊ दिवसांमध्ये पाऊस किंवा थंड वारे नसल्यास मानसूनचा पाऊस चांगला होईल आणि या दिवसात पाऊस आला तर मान्सूनचा प्रवास अडथळ्यांचा असेल अशी मान्यता आहे.
राज्यातील विविध शहरांमधील आजचे तापमान -
मुंबई - 31.4
महाबळेश्वर - 19.6
नाशिक - 26.6
बुलडाणा - 31.11
नागपूर - 31.6
वर्धा - 32.5
मालेगाव - 28.4
जळगाव - 30.2
तळेगाव - 26.31
राजगुरुनगर - 28.51
पुणे - 27.4
हेही वाचा - Navatpa Day 2 : नवतपाच्या दुसऱ्या दिवशी 'हा' शहर ठरला सर्वाधिक उष्ण!
पृथ्वीला थंडावा मिळत नाही अन् उष्णता वाढते - नवतपाच्या वेळी सूर्य किरणं थेट पृथ्वीवर येतात ज्यामुळे तापमानात वाढ होते. या उच्च तापमानामुळे मैदानी क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र बनते जे समुद्री लाटांना आकर्षित करतं. यामुळे अनेक ठिकाणी थंड, वादळ आणि पाऊस येण्याची दाट शक्यता असते. या वेळी वारं वाहत असलेले चालते पण पाऊस नसावा. असे झाल्यास पाऊस व्यवस्थित होईल. नक्षत्राचे अधिपती चंद्रमा आहे. अश्या वेळी जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो चंद्राचा थंडावा संपवून उष्णता वाढवतो. त्यामुळे पृथ्वीला थंडावा मिळत नाही आणि उष्णता प्रचंड वाढते.