ETV Bharat / city

Flower crown world record : फुलांचे मुकुट बनवण्याचा स्वाती गादेवार यांनी रचला विश्वविक्रम - इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

जगात रोज कोणत्या - कोणत्या गोष्टीचे विक्रम रचले जातात. आता यामध्ये एका अनोख्या विक्रमाची भर पडली आहे. 108 फुलांचे मुकुट (tiaras) तयार करून हा विक्रम बनवला गेला आहे. या विक्रमाची एकाच दिवशी दिवशी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( India Book of Records ) आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड (Asia Book of Records ) नोंद झाली आहे.

Swati Gadewar
स्वाती गादेवार
author img

By

Published : Dec 28, 2021, 9:54 AM IST

Updated : Dec 28, 2021, 1:05 PM IST

नागपूर : नागपुरातील प्रसिध्द फ्लोरल आर्टिस्ट ( Famous Floral Artist from Nagpur ) यांनी फुलांचे मुकुट बनवण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम केला आहे. नागपूरच्या स्वाती गादेवार यांनी सात तासात तब्बल 108 फुलांचे मुकुट(tiaras) तयार करून हा विक्रम बनवला आहे. यांसाठी 100 मुकुट बनवण्याचे उद्धिष्ट ठेवून 108 मुकुट हे 6 तास 56 मिनिटांत पूर्ण केले आहे. त्यांचे फुलांपासून बनवलेले दागिने हे पॅन इंडियास विक्रीस जातात. नव नवीन डिजाईन आणि कल्पकतेमुळे फुलांनी सजविलेल्या दागिन्यांना विशेष महत्त्व आले आहे. लहानपणी देवघरातील देवांसाठी फुलांचे हार बनवण्याची आवड होती. हीच आवड पुढे करियर बनली. त्याचबरोबर आता विश्वविक्रमावार नाव कोरण्याचे माध्यमही ठरले आहे.

स्वाती गादेवार
एकाचवेळी दोन रेकॉर्डवर कोरले नाव -स्वाती गादेवार यांनी एकाच दिवशी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( India Book of Records )आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ( Asia Book of Records )हे दोन रेकॉर्डवर आपले नाव कोरले आहे. फुलांचे मुकुट म्हणजेच टियारा बनवण्याचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच केला नव्हता. त्यामुळे हा रेकॉर्ड बनवणाऱ्या त्या पहिल्याच ठरल्या आहेत. नागपूरच्या चिटणवीस सेंटर ( Chitnavis Center Nagpur ) येथे सकाळी 7 वाजून 30 मिनीटांनी हा रेकॉर्ड बनवायला सुरवात केली. विश्वविक्रम करतांना त्यांना 100 टियारा हे 7 तासात बनवायचे होते. पण त्यांनी हा विक्रम 6 तास 56 मिनिटं 4 सेकंदात पूर्ण केला. महिला सशक्तीकरणाचा दिला संदेश -फुलांचे हार किंवा सजावट करण्याची आवड स्वाती गादेवारांना होती. या आवडीचे रूपांतर प्रशिक्षक म्हणून झाले. तसेच पॅन इंडियाच्या मागणीमुळे सर्वत्र डिजाईन आणि फुलांचे दागिने विकले जाऊ लागले. यातून त्यांनी घरात बसून असणाऱ्या महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे महिलांच्या सौंदर्यात भर घालणारा मुकुट हा महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठीचा संकल्प घेतला. दोन वर्षांपासून यासाठी तयारी केली. अखेर त्यांनी स्वतःच्या जन्मदिनी हा रेकॉर्ड बनवण्याचा मुहूर्त साधला असल्याचे स्वाती गादेवार सांगितले. फुलांसोबत काटेही रुततात या टियारा (मुकुट) बनवतांना फुलांना बांधण्यासाठी ताराचा उपयोग होतो. त्यामुळे जरी हा ताज फुलांचा असला तरी हे बनवताना तार रुततात. तसेच सतत सात तास 108 मुकुट बनवतांना वेदनाही सहन कराव्या लागल्यात. यातून हा विश्वविक्रम नावावर झाला. पण पहिल्यांदाच रेकॉर्ड बनवताना मोठ्या रेकॉर्डचे उद्दिष्ट उभे केले.

Last Updated : Dec 28, 2021, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.