नागपूर - भाडेकरूंच्या त्रासाला कंटाळून घरमालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुकेश रिझवाणी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घरमालकाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ तयार करून त्यांनी व्हायरलदेखील केला.
कोरोना काळात मुकेश रिझवाणी यांनी राजेश सेतिया नावाच्या भाडेकरुला घर भाड्याने दिले होते. या काळात भाडेकरुने घरभाडे दिले नाही. उलट घर मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसूल केली. त्यामुळे मुकेश रिझवाणी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा-प्रेमास नकार दिल्याने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कस्तुरबा नगर परिसरात मुकेश रिझवानी यांचे घर आहे. २०१९ साली ज्यावेळी कोरोना नागपूरमध्ये धुमाकूळ घालत होता. त्यावेळी घर मालक मुकेश रिझवानी यांनी राजेश सेतीयाला घराच्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या. या काळात राजेश सेतीया यांनी घरमालक मुकेश रिझवानी यांना घर भाडे देणे अपेक्षित होते. मात्र ज्यावेळी मुकेश हे राजेश सेतीया यांच्याकडे घरभाडे मागण्यासाठी गेले. तेव्हा राजेश सेतीया आणि त्याचा भाऊ मूलचंद सेतीया यांनी मुकेश रिझवानी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. भाडेकरूकडून सुरू असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी भाऊ फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितले.
हेही वाचा-सीसीटीव्ही : क्रिकेट खेळतताना चक्कर येऊन मुलाचा मृत्यू
घर रिकामे करण्यासाठी भाडेकरूला दिले पैसे
आरोपी भाडेकरू राजेश सेतीया हा मुकेश यांना वारंवार धमकी देत होता. घर रिकामे करून हवे असले तर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपी सेतीया याने मुकेश यांच्याकडे केली. घर रिकामे झाल्यास कायमची कटकट सुटेल म्हणून मुकेश रिझवानी यांनी सेतीयाला काही पैसेही दिले. मात्र, त्यानंतर आरोपी राजेश सेतीयाने घर रिकामे करण्याऐवजी आणखी पैसे मागितले. त्यामुळे मुकेश रिझवानी भाडेकरूंच्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास आत्महत्या केली.
हेही वाचा-प्रेम संबंधाच्या संशयातून पतीची हत्या; पत्नीला अटक तर साथीदार फरार
आत्महत्या करण्यापूर्वी तयार केला व्हिडीओ
घरमालक मुकेश यांना भाडेकरू राजेश सेतीया हा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक दडपणाखाली वावरत होते. राजेश घर रिकामे करत नसल्याने मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.