नागपूर- गेल्या अनेक दिवसांपासून रखरखत्या उन्हाने होरपळणाऱया नागपूरकरांना पावसामूळे काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसानं तापमानात काहीशी घट झाल्यानं वातावरणात थंडावा आला आहे.
शहराचं तापमान ४८ अंशावर पोहोचेल अशी परिस्थीती असतानाच दुपारी साडे तीनच्या दरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. सुमारे अर्धातास चाललेल्या या पावसानं नागपुरकर चांगलेच सुखावले.