नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचा 109वा दीक्षांत ( Nagpur University Convocation ) समारोह उद्या (बुधवारी) आयोजित करण्यात आला आहे. बीए, एलएलबीची विद्यार्थीनी अपराजित गुप्ताने 8 सुवर्ण पदकांसह दोन ( Gold Medalist Student In Nagpur University ) पारितोषिके पटकावत पदक तालिकेत पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. तर जी.एस रायसोनी येथून एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण करणारी आरजु बेग या विद्यार्थ्यांनीने 7 गोल्ड मेडल प्राप्त मेडल प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. महत्वाचे म्हणजे सर्वाधिक मेडल मिळवण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या यादीत पहिल्या चार विद्यार्थीनी आहेत हे विशेष.
अपराजीता गुप्ता - ही विद्यार्थीनी मध्यप्रदेशच्या छिंदवाडा शहराची निवासी आहे. शिक्षणासाठी ती नागपूरला आली होती. अपराजीताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉमधून बीए एएलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण सुरू करताना कधीही गोल सेट केला नव्हता. मात्र, फोकस राहून अभ्यास करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळेचं एवढं मोठं यश संपादन करता आलं असं ती सांगते. केवळ कायद्याचा अभ्यास करून चालणार नाही तर कायद्यातील बारकावे, एखादा कायदा कश्यासाठी तयार झाला, त्याचा उपयोग किती आणि कसा होतो आहे, हे देखील समजून घेणं गरजेचं आल्याची जाणीव ठेवून अभ्यास केला त्यामुळे आज कायद्याच्या अभ्यासक्रमात तब्बल 8 गोल्ड मेडल आणि 2 पारितोषिक तिला प्राप्त झाली आहेत. कधीही दिवसभर अभ्यास केला नाही. मात्र, वर्षभर दिवसातील किमान 1 तास तरी अभ्यास केला असल्याचं अपराजीता सांगते. या दरम्यान अपराजीता ही सोशल मीडियावर सक्रिय होती. मोज मज्जा करत पाच वर्षातील 10 सेमिस्टरमध्ये तिने टॉप केलं आहे. केवळ फेकस राहून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. प्राध्यापक तर शिकवतात. मात्र, सेल्फ स्टडी केल्याशिवाय एवढं मोठं यश मिळेल, अशी अपेक्षा करता येणार नसल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे. अपराजीता प्रोफेसर व्हायचं आहे. सोबतचं रिसर्च करण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे.
आरजू बेग - या विद्यार्थ्यांनीने जी.एस रायसोनी कॉलेज मधून एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आरजु बेगला 7 गोल्ड मेडल जाहीर झाले आहेत. महत्वाचं म्हणजे आरजुचं कॅम्पस सिलेक्शनदेखील झालं असून तीने मुंबई येथे रिलायन्स कंपनीत नोकरी मिळवली आहे. आरजुने एमबीएसाठी प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले होते. सुरुवातीचे केवळ 4 महिनेचं कॉलेजला जाण्याची संधी तिला मिळाली. त्यानंतर संपूर्ण अभ्यास ऑनलाइन पध्दतीनेचं करावा लागला. या दरम्यान एमबीएचे विभागप्रमुख डॉ. मनीष छावा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे मला आज एवढं मोठं यश मिळाल्याचं ती सांगते. ऑनलाइन अभ्यास सुरू असताना कधीही सोशल मीडियाच्या दूर गेली नाही. मात्र, ज्यावेळी अभ्यास करायचा असेल तेव्हा सेल्फ कंट्रोल ठेवून तेवढा वेळ सोशल मीडियापासून दूर राहत असल्याचं तिने सांगितले आहे. वर्षभर प्रत्येक दिवशी थोडा थोडा वेळ अभ्यास करून दोन वर्षातील चारही सेमिस्टरमध्ये टॉप केल्याचं ती गर्वाने सांगते. मला एमबीएचं करायचं आहे. हे मी खूप आधीचं ठरवलं होतं, म्हणून मला फार जड गेलं नसल्याचं ती सांगते. एकाद्या विद्यार्थ्यांला ज्या क्षेत्रात रुची असेल त्याने त्याचेचं शिक्षण घेतल्यास जीवनात भरपूर यश मिळेल, असा सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला आहे.
हेही वाचा - अमेरिकेत 18 वर्षीय शूटरचा शाळेत अंदाधुंद गोळीबार एका शिक्षकासह १८ जण ठार, हल्लेखोराची आत्महत्या