नागपूर - गणेशपेठ आगारात डिझेल संपल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रद्द झाल्या आहेत. गणेशपेठ आगार परिवहन मंडळाचे मुख्य आगार आहे.
आज पहाटेपासून डेपोमध्ये डिझेल नसल्याचे सांगण्यात येत आहे. डिझेल नसल्याने सकाळपासून 35 ते 40 बसेस रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून काही कारणांमुळे डिझेल टँकर आगारापर्यंत पोहोचला नसल्याची माहिती आगार कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे.