ETV Bharat / city

Ganesh festival 22 विदर्भातील गणेशोत्सवाची तऱ्हाच न्यारी, पहा कसा साजरा केला जातो हाडपक्या गणेशोत्सव - विदर्भातील गणेशोत्सव 2022

विदर्भात गणेशोत्सव Ganesh festival मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. विदर्भात मस्कऱ्या गणपतीची Ganesh festival In Nagpur परंपरा २६७ वर्षे जुनी आहे. समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू Shrimant Raje Khandoji Maharaj Bhosale यांनी मस्कऱ्या गणपतीची स्थापना वर्ष १७५५ मध्ये केली होती. विदर्भातील गणपतीला पुरणाचे मोदक Puran Modak दिले जातात, हे विदर्भातील गणपतीचे वेगळेपण आहे.

Maskarya Ganesh festival 22
मस्कऱ्या गणेशोत्सव
author img

By

Published : Aug 30, 2022, 5:31 PM IST

Updated : Aug 31, 2022, 5:06 PM IST

नागपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या ganesh festival in maharashtra आगमनाचा मुहूर्त अगदी जवळ आलेला आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असला, तरी राज्याच्या प्रत्येक भागात या उत्सवाचे वेगळेपण आहे. विदर्भात मात्र गणपती बाप्पाचे ganesh festival in vidarbha आराधना फार वेगळ्या प्रकारे केल्या जाते, याबाबतची माहिती ईटीव्ही भारतच्या वाचकांना देण्याचा हा प्रयत्न.

सोयीप्रमाणे बदलल्या रित, प्रथा विदर्भ हा अखंड महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. राज्याच्या इतर भागा प्रमाणेच विदर्भात देखील गणेशोत्सव ganesh festival मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. दहा दिवस चैतन्याच्या आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो. लोकांच्या व्यस्थतेमुळे आता काही रित, प्रथा आपल्या सोयीप्रमाणे बदलल्या आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत बाप्पाची मूर्ती चतुर्थीच्या ganesh chaturthi दिवशी सकाळी घरी आणली जायची. मात्र, आता आदल्या दिवशीच बापाचे घरी आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. मुहूर्तानुसार बाप्पाची मूर्तीची स्थापना ganesh idol establishment केली जाते. ज्यांना जमेल ते गणेशभक्त गुरुजींकडून गणपतीची स्थापना करतात. इतर ठिकाणी नागरिक स्वतःच्या भावनेनुसार मूर्ती स्थापना करण्याचा विधी पूर्ण करतात.

विदर्भात बाप्पासाठी होतात पुरणाचे मोदक - गणपती बाप्पाला Modak for ganesh idol मोदक सर्वाधिक प्रिय आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील ganesh festival दहा दिवस बाप्पाला मोदकाचा प्रसाद दाखवला जातो. ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र western Maharashtra आणि कोकणात konkan बाप्पासाठी उकडीचे मोदक modak तयार केले जातात. त्याच प्रकारे विदर्भात पुरणाचे मोदक Puran modak in vidarbha तयार केले जातात. याशिवाय लाडूचा प्रसाद देखील प्रसिद्ध आहे. अनेक गणेशभक्तांच्या घरी करंजी, वडे आणि पुरीचा फुलोरा तयार केला जातो.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी परतले - नागपूर हे विदर्भातील सर्वात महत्वाचे शहर असल्याने इतर जिल्ह्यातील हजारो चाकरमानी नागपूरला वास्तव्यास आहेत. मात्र, गणेशोत्सव ganesh festival काळात अनेक चाकरमानी आपल्या गावी परतले असून गणपतीची स्थापना ganesh idol establishment झाल्यानंतर ते सर्व पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतणार आहेत.

विदर्भात हाडपक्या (मस्कऱ्या) गणपती प्रसिद्ध - विदर्भात हाडपक्या ( मस्कऱ्या ) गणपतीची maskarya Ganesh festival In Nagpur परंपरा २६७ वर्षे जुनी आहे. मस्कऱ्या गणपतीची स्थापना समशेर बहाद्दर श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले ऊर्फ चिमणाबापू Shrimant Raje Khandoji Maharaj Bhosale यांनी वर्ष १७५५ मध्ये केल्याचे ऐतिहासिक दाखले आढळतात. एका वर्षी खंडोजी महाराज Shrimant Raje Khandoji Maharaj Bhosale बंगालच्या स्वारीवर होते आणि ते स्वारीवरून परत येईपर्यंत कुळाचारी गणपतीचे विसर्जन Ganesh Idol immersion झालेले होते. विद्वानांच्या सल्ल्याने त्यांनी पितृपक्षातील चतुर्थी तिथीला गणरायाची स्थापना केली. त्यालाच हाडपक्या किंवा मस्कऱ्या गणपती maskarya Ganesh festival In Bhansale Palace म्हणून उत्सव साजरा केला जातो.

हेही वाचा Lalbagh Raja 2022 लालबागच्या गणरायाच्या एका मुद्रेला पाहण्यासाठी जनता आसुसली

Last Updated : Aug 31, 2022, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.