ETV Bharat / city

पीक कर्ज माफीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार - Nagpur Latest News

राष्ट्रावीदी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Nov 15, 2019, 3:27 PM IST

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या कपाशी, संत्रा आणि धान पिकाची पाहणी केली. विदर्भातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लक्ष घालावे यासाठी माझे प्रयत्न राहाणार आहे. मी कृषीमंत्री आणि अर्थ मंत्री यांच्यासोबत चर्चा करण्याच्या प्रयत्नात आहे. पीक कर्ज माफ करण्यासाठी कोणती योजना करता येईल का, यासाठी चर्चा करणार आहे. आगामी वर्षासाठी केंद्र सरकारकडून काही मदत देता येईल का? यावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही पवार म्हणाले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पवार म्हणाले, संत्र्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे ६०ते७० टक्के संत्री गळाली असून जो माल झाडावर शिल्लक आहे, त्याचा आकार लहान आहे. या पावसाचा धान उत्पादनावरही विपरीत परिणाम झाला आहे. धानात दानाच भरलेला नाही, तर कपाशीच्या झाडांची वाढ चांगलीच झाली असली तरी बोंडांची संख्या कमी प्रमाणात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेल्या नुकसानीच्या माहिती नुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. साधारणता ४४,२१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणांनी ६,८०० हेक्टरी मदत देण्याचा आकडा दिला आहे.

फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण वर्षाचे पीक बाधित झाले आहे. औरंगाबाद-जालना जिल्ह्यातही असेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी योजना करता येईल का आणि आगामी वर्षासाठी केंद्र सरकारकडून काही मदत देता येईल का, यावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पवार म्हणाले.

Intro:Body:

शरद पवार नागपूर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. 

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 

- विदर्भातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेत मालाचे नुकसान झाल्याचे माझ्या कानावर आले होते. राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु होत्या त्यामुळे मला येण्याची इच्छा असून मी या शेतीची पाहाणी करण्यासाठी येऊ शकलो नाही. 

- शेतकऱ्यांचे अभूतपूर्व नुकसान. संत्र्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान. अतिवृष्टीमुळे ६०ते७० टक्के संत्री गळून पडली. जो माल झाडावर शिल्लक आहे त्याचा आकार लहान आहे. त्यावर रोग आला आहे. 

- पडलेली संत्री काढण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे. संत्रा उत्पादक अतिशय संकटात आला आहे. 

- धान उत्पादनावरही अतिवृष्टीचा विपरीत परिणाम झाला आहे. धानात दानाच भरलेला नाही. 

- कपाशीच्या झाडांची वाढ चांगली झाली असली तरी बोंडं भरलेली नाही. कपाशी उत्पादकांनाही मोठे नुकसान झाले आहे.

- संत्री, कपाशी, धान, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे चित्र विदर्भ दौऱ्यात पाहायला मिळाले आहे. 

- जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानाची माहिती मागवली आहे. त्यानुसार जिथे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्याचेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

- ४४,२१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे सरकारी सर्वेक्षण आहे. 

- हेक्टरी ६,८०० मदत देण्याचा आकडा शासकीय यंत्रणांनी दिला आहे. 

- सरकारी यंत्रणांनी दिलेले आकडे हे मोजके आहेत. यापेक्षा अधिक शेतकरी बाधित झाले असल्याचे वस्तूस्थिती पाहिल्यानंतर कळते. 

- फळबागांचे नुकसान हे मोठे आहे. संपूर्ण वर्षाचे पिक बाधित झाले आहेत.

- आर्थिक नुकसानीचे दोन भाग आहेत. शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतले आहे आणि दुसरे त्यांनी जे पिक घेतले होते ते पूर्णपणे गेले आहे त्यामुळे पुढील वर्षी पिक कसे घ्यायचे यासाठी त्यांना वेगवेगळी मदत देण्याची गरज आहे.

- पिक कर्ज माफ करण्यासाठी योजना करता येईल का, यासाठी चर्चे केली जाईल. दुसरे त्यांना आगामी वर्षासाठी केंद्र सरकारकडून काही मदत देता येईल का यावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. 

- सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लक्ष घालावे यासाठी आमचे प्रयत्न राहाणार आहे. 

- कृषि मंत्री आणि अर्थ मंत्री यांच्यासोबत चर्चा करण्याचे प्रयत्न आहेत. त्यांच्याकडून निश्चित मदत मिळाली नाही तर पंतप्रधानांशीही चर्चे केली जाईल. 

- औरंगाबाद - जालन्यातही असेच नुकसान झाले आहे.

- केंद्र शासनाला या नुकसानीची किती माहिती आहे याची माहिती नाही, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही परिस्थिती पोहोचवणार आहे.

- काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संयुक्त जाहीरनाम्यात कर्जमाफीचा मुद्दा आहे. आता ती कशी द्यायची यावर चर्चा होईल. 

- -------

राजकीय परिस्थिती

- देवेंद्र फडणवीसांचा ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास आहे हे मला नव्याने कळाले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.