ETV Bharat / city

उन्हापासून संरक्षण पण, लसीकरणासाठी नंबर लावतावेळी ज्येष्ठांना राहावे लागते ताटकळत उभे - nagpur vaccination news

मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी मागील तीन दिवसांपासून होत आहे.

nagpur vaccination
नागपुरात ज्येष्ठांना लसीकरण
author img

By

Published : Mar 4, 2021, 7:23 PM IST

नागपूर - मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी मागील तीन दिवसांपासून होत आहे. तेच दुसरीकडे वाढत्या तापमानाचा पारा पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठी मंडप टाकून सावलीत बसण्याची सोय करून देण्यात आली आहे. पण असे असले तरी नाव नोंदणीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा पाहता यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी घेतलेला आढावा

ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या माहामारीपासून बचाव व्हावा म्हणून लसीकरण मोहिमेला सूरवात झाली आहे. यात पाहिल्या दिवशी जेष्ठ नागरिकांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र पाहयाला मिळाले. दुसऱ्या दिवशी तशीच परिस्थिती असल्याने ऑनलाईन नाव नोंदणी करून लांब रांगा लावून बसावे लागत असल्याने टोकन वाटप करण्यात आले. जेणेकरून नागरिकांना टोकननुसार केंद्रावर येता येईल.

टोकन मिळवण्यासाठी सकाळपासून गर्दी

टोकन घेण्यासाठी सकाळी 6 ते 7 वाजतापासून रांग लावली जात आहे. त्यानंतर 11 वाजताच्या सुमारास रुग्णलाय प्रशासनाकडून टोकन दिले जात आहे. यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून जवळपास तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे टोकन मिळवण्यासाठी वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन ते तीन तास टोकन मिळवण्यासाठी उभे राहत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे ठराविक लोकांना दररोज लस दिली जात असल्याने अनेकांना लाईनीत उभे राहून सुद्धा टोकन मिळू न शकल्याने वयोवृद्ध महिलेने सांगितले आहे.

उन्हाचा पारा वाढल्याने मंडप

नागपुरात सध्या 35 ते 40 अंशच्या घरात तापमान जाऊन पोहचले आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना आगोदरच शुगर बीपी सारखे गंभीर आजार असल्याने त्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. यामुळे खबरदारी म्हणून मंडप टाकण्यात आला आहे. सोबतच रुग्णालयात आतील गर्दी कमी करत बाहेर खुर्ची टाकून बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना जेष्ठ नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे.

मनुष्यबळ वाढवण्याची गरज

या सर्वांना विना त्रास लस उपलब्ध करण्यासाठी नियोजन केले जात आहे. यात काही प्रमाणात मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. तसेच कोविन अँपमध्ये नोंदणी नंतर इथे करावी लागणाऱ्या प्रक्रियेसाठी कम्प्युटर ऑपरेटर वाढवण्या संदर्भात अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याशी चर्चा झाली आहे. यावर तोडगा काढला जाईल असे सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी इटीव्हीसोबत बोलतांना सांगितले.

हेही वाचा - फडणवीसांचे तृतीयपंथीयासोबतच्या पोस्टप्रकरणी कारवाईचे अजित पवारांचे आदेश

हेही वाचा - महिला रुग्णाला शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टर बडतर्फ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.