नागपूर : सचिन वझे यांचे व्हॉटसअॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. त्यात त्यांनी जगापासून निरोप घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर मी माहिती घेतो असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हटले.
वझेंचे स्टेटस व्हायरल -
मुंबईहून विमानाने नागपूरला आल्यानंतर विमानतळावर गृहमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मी नुकताच मुंबईहून येथे आलो आहे. याबाबत माहिती घ्यावी लागेल असे देशमुख सचिन वझेंच्या व्हॉटसअॅप स्टेटसवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. '17 वर्ष संयम ठेवून लढलो. पण यावेळी मला लढण्यासाठी ना वेळ आहे ना संयम आहे. आता जगाला अलविदा करण्याची वेळ आली आहे.' असे वझेंचे स्टेटस व्हायरल झाले आहे.
लॉकडाऊनविषयी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार -
नागपुरात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यांनी हा निर्णय घेताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी केला आहे. या संदर्भात विचारणा केली असता मी मुंबईला होतो. पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करतो असे ते म्हणाले. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनीही ही लॉकडाऊन संदर्भात विचारण्यात आले नव्हते असा आरोप केला आहे.
हेही वाचा - पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात अडकवल्याचा सचिन वझेंचा दावा; व्हाट्सअॅप स्टेटसमधून व्यक्त केला मृत्यूचा विचार?