ETV Bharat / city

नागपूरचा ग्रॅण्डमास्टर 'संकल्प'; सर्बियातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पटकावला किताब

पहिले ग्रँडमास्टर होण्याचा किताब ज्याचा नावावर आहे असे विश्वनाथ आनंद यांनीही संकल्पला शुभेच्छा दिल्या. लवकरच भारत हा 100 ग्रँडमास्टर असणाऱ्या देशाकडे वाटचाल करणार असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. संकल्प हा 71 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. पण विश्वनाथ आनंद यांच्या कौतुकाची थाप मिळाल्याने नक्कीच एक ऊर्जा मिळाली असून यात आणखी परिश्रम घेऊन पुढचा टप्पा हा 2600 येलो रेटिंगसाठी संकल्प तय्यारी करत असल्याचा सांगत होता.

author img

By

Published : Nov 12, 2021, 10:50 AM IST

नागपूरचा ग्रॅण्डमास्टर 'संकल्प'
नागपूरचा ग्रॅण्डमास्टर 'संकल्प'

नागपूर - नागपुरातील संकल्प गुप्ता ज्याचा वयाच्या चौथ्या वर्षी सुरू झालेला ग्रँडमास्टर होण्याचा प्रवास वयाच्या अठराव्या वर्षी पूर्ण झाला आहे. नुकत्याच सर्बिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ग्रँडमास्टर हा किताब मिळवला आहे. तो उपराजधानी नागपुरातील दुसरा तर विदर्भातील तिसरा असून देशाच्या रँकिंगमध्ये 71 वा ग्रॅण्डमास्टर झाला आहे. पण त्याचा हा प्रवास कसा सुरू झाला हे जाणून घेऊया या विशेष वृत्तातून...

सर्बियातील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पटकावला किताब

नागपुरातील व्यापारी कुटुंबातील संकल्प याने वयाच्या चौथ्या वर्षांपासून बुद्धीबळ खेळायला सुरूवात केली. यात यंदा सर्बियात 24 दिवस चाललेल्या तीन जीएम नॉर्म पूर्ण करत त्याने 2 हजार 504 च्या वर येलो रेटिंग मिळवले आहे. त्याने या स्पर्धेत 6.5 गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. पुढेही खेळत राहण्याचा संकल्पचा 'संकल्प' आहेच. पण हे यश मिळवताना त्यानेही कठोर परिश्रम घेतले आहे. अवघ्या 4 वर्षाचा असताना संयुक्त कुटुंबात मोठे भाऊ-बहीण बुद्धीबळ खेळतांना पाहत होता. त्यांना पाहता पाहता संकल्पनेही खेळायला सुरुवात केली. बुद्धीबळ शिकवायला घरीच शिक्षक येऊन लागले. तो ही जिद्दीने मन एकाग्र करत खेळत गेला. हळूहळु बुद्धीबळ स्पर्धेत सहभाग घेत कटशाह डाव खेळत स्पर्धेत येलो रेटिंग मिळवत गेला.

नवीन संकल्प सुपर ग्रँडमास्टर होण्याचा -

स्पर्धा म्हटली की यश-अपयश आलेच. या सगळ्यात काही ठिकाणी दुसरा तर काही काही स्पर्धेत तिसरा तर कुठे अपयशही आले. अनेकदा तो हरला की रडत बसायचा पण अनुभवातून समृद्ध होत गेला. हरवून थांबण्यापेक्षा त्याने अधिक जिद्दीने स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरले. तो अधिक वेळ चेस खेळत राहत होता. यासाठी रोज सराव आणि सातत्य जपले आणि पुढे ग्रँडमास्टर होण्यासाठी खेळत गेला. ते स्वप्न आता त्याचे पूर्ण झाले आहे. पण सुपर ग्रँडमास्टर होण्याचा 'संकल्प' मनाशी बाळगून तो खेळत आहे. लवकरच स्पेनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो जाणार असल्याचेही त्याने सांगितले.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पटकावला किताब

अभ्यासात प्रगती साधण्यास चेसची मदत -

या काळात चेस खेळत असला तरी सध्याच्या घडीला प्रत्येक मिनिटाला मोबाईल घेऊन सोशल मिडियावर फॉलो करणाऱ्या युवा पुढीप्रमाणे तो जगला नाही. त्याने आभासी जगापासून दूर राहणे पसंत केले. तो सध्या बीबीए करत आहे. परीक्षेच्या काळात तो चेस खेळणे कमी करून अभ्यासात रमायचा. त्यानंतर पुन्हा चेसला प्राधान्य द्यायचा. चेसमुळे त्याच्या अभ्यासाठी लागणारी एकाग्रता वाढत गेल्याने कमी वेळेत जास्तीत-जास्त अभ्यास करण्यासही मदत झाल्याचे संकल्प सांगतो.

महापौर दयाशंकर तिवारी यांनीही संकल्पचा सत्कार केला.

ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यानेही केले कौतुक

पहिले ग्रँडमास्टर होण्याचा किताब ज्याचा नावावर आहे असे विश्वनाथ आनंद यांनीही संकल्पला शुभेच्छा दिल्या. लवकरच भारत हा 100 ग्रँडमास्टर असणाऱ्या देशाकडे वाटचाल करणार असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. संकल्प हा 71 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. पण विश्वनाथ आनंद यांच्या कौतुकाची थाप मिळाल्याने नक्कीच एक ऊर्जा मिळाली असून यात आणखी परिश्रम घेऊन पुढचा टप्पा हा 2600 येलो रेटिंगसाठी संकल्प तय्यारी करत असल्याचा सांगत होता. तसेच संकल्प गुप्ताच्या यशाने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. सोबत उपराजधानी नागपूरच्या क्रीडा क्षेत्रासह सर्वत्र कौतुक होत आहे. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनीही संकल्पचा सत्कार केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.