ETV Bharat / city

Sanjay Raut Critisized BJP : 'पंतप्रधान मोदींना दोन तासही झोपू द्यायचे नाही, असं राज्यातील भाजप नेत्यांनी ठरवलं आहे' - मोदी झोप चंद्रकांत पाटील वक्तव्य

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची झोप शिवसेनेमुळे ( Sanjay Raut Critisized BJP Leader On Narendra Modi Sleep ) उडालेली आहे. त्यामुळेच की काय मोदीजींचे झोपेचे दोन तासही कमी करण्याच्या मागे महाराष्ट्रातील नेते लागले आहे, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी ( Sanjay Raut In Nagpur ) बोलत होते.

Sanjay Raut Critisized BJP
Sanjay Raut Critisized BJP
author img

By

Published : Mar 21, 2022, 10:54 PM IST

नागपूर - महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची झोप शिवसेनेमुळे ( Sanjay Raut Critisized BJP On Narendra Modi Sleep ) उडालेली आहे. त्यामुळेच की काय मोदीजींचे झोपेचे दोन तासही कमी करण्याच्या मागे महाराष्ट्रातील नेते लागले आहे, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी ( Sanjay Raut In Nagpur ) बोलत होते. ते आजपासून चार दिवस विदर्भाला संपर्क अभियान दौऱ्यावर आहे.

प्रतिक्रिया

काय म्हणाले संजय राऊत -

पंतप्रधान मोदीजी जवळजवळ 22 तास काम करतात हे सगळ्यांना माहीत आहे. मी दिल्लीत सर्वाधिक काळ असतो. पण आता उरलेले दोन तासही त्यांना झोपू द्यायचे नाही, असे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ठरवले असावे. त्यानुसार भाजपचे नेते कामाला लागले असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपुरातील नेत्यांना मुंबई प्रिय आहे. आम्हा मुंबईकराना नागपूर प्रिय आहे, असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसंपर्क अभियानाला सुरवात केली असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विदर्भ मराठवाड्यात शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आलेले आहे. मराठवाडा आणि विदर्भ सगळे खासदार अभियानावर निघालेले आहे. शिवसेनेचे खासदार विदर्भातील जिल्ह्यात पोहचतील मुंबई आणि ठाण्यातून 20 लोकांची टीम त्यांच्या सोबत असेल. चार दिवसांनी सर्व मिळून एकत्रपणे मुंबईत एकत्र भेटून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे याना अहवाल सादर करू, असेही संजय राऊत म्हणाले.

सर्वाधिक ईडीच्या कारवाई मोदी सरकारच्या काळात झालेली आहे. संपूर्ण देश सोडला पण पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे केंद्रीय तपस यंत्रणा ईडीचे अधिकारी काम करतात, अशी टीकाही केली. सर्वाधिक कारवाईचा विक्रम केला आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच सावजी मटण खाण्याचा आग्रह अमृता वहिनी साहेबांनी केला आहे, तर तो आग्रह पाळू, असेही उत्तर राऊत यांनी मिश्किली करत दिले.

हेही वाचा - Special Bench For MP MLA Cases : आजी माजी खासदार-आमदारांविरोधातील गुन्हे निकाली काढण्याकरिता विशेष खंडपीठाची निर्मिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.