नागपूर - निर्माण काळातचं अपघातांच्या शुक्लकाष्टात अडकलेला बहुप्रतिक्षित नागपूर-मुंबई 'समृद्धी एक्सप्रेस-वे'च्या ( Nagpur Mumbai Samriddhi Expressway ) उद्घाटनाचा मुहूर्त जवळजवळ निश्चित झाला ( Inauguration of Nagpur Mumbai Samriddhi Expressway ) आहे. नागपूर ते शिर्डी पर्यंतचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात ( Inauguration Samriddhi Expressway ) आले. दिवाळीच्या मुहूर्तावर () उदघाटनाचा बेत आखला जातो आहे. मात्र,तोच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सरकारकडून उद्घाटनाची घाई तर केली जात नाही ना, कारण गेल्या सरकारने अशीच घाई केली होती, जी काही कामगारांचे जीवा धोक्यात घालणार ठरली होती. समृद्धी मार्गावर अद्याप बरेच छोटे छोटे निर्माण कार्य शिल्लक आहेत.
मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) संकल्पनेतुन या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. प्रकल्पाने आकार घेतला असून आता राज्यकर्त्यांनी उदघाटनाची घाई झालेली आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांची वेळ मागण्या आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतचं या महामार्गाचे उद्घाटन करण्यात येईल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
समृद्धी महामार्गाचे विश्लेषण - मुंबई ते नागपूर द्रुतगतीमार्ग म्हणजेचं समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा,८ पदरी,१२० मीटर रुंदीचा महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला जोडणारा आहे. हा समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यातून २६ तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे. या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी ५६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
उदघाटनापुर्वीचं अपघातांचे शुक्लकाष्ठ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळावाला मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. दौलताबाद जवळ दहा वाहने एकमेकांवर आदळली होती. याशिवाय महामार्गाचे निर्माण सुरू असताना नागपूरजवळ कमान कोसळल्यामुळे अपघात झाला होता, तर वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर जोगलदरी गावाजवळ पुलाचे काम चालू असताना पुलाचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे समृद्धी महामार्गच्या उद्घाटनापूर्वी सर्व कामे झाली आहेत की नाही. याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.