नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाती धर्माचा नावावर वाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या पद्धतीचे कृत्य करत असल्याने राज ठाकरे यांना कायद्यात सुधारणा करून फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी समाजवादी पार्टीचे महासचिव एजाज खान यांनी नागपुरात केली. ते रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारकडून गुन्हा दाखल करण्यासही विलंब - राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करा, अशी विनंती केली. जेणेकरून भविष्यात कोणी जाती जातीत तेढ निर्माण करणार नाही. तसेच यात महाविकास आघाडी सरकारने गुन्हा दाखल करण्यासही विलंब केला आहे. या अगोदरच सभेच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, असेही एजाज खान म्हणालेत.